Thu, Jun 20, 2019 01:10होमपेज › Kolhapur › हमीभावात शेतकर्‍यांचे कष्ट ‘माती’मोल!

हमीभावात शेतकर्‍यांचे कष्ट ‘माती’मोल!

Published On: Jul 06 2018 1:32AM | Last Updated: Jul 05 2018 11:52PMकोल्हापूर : निवास चौगले 

पिकांचा हमीभाव ठरवताना त्यात शेतकर्‍यांच्या कष्टाचे मोल, त्याच्या जमिनीचे भाडे याचाही अंतर्भाव करावा, ही शेतकर्‍यांची मागणीच दुर्लक्षित झाली आहे. पीक पिकवताना बियाणे, खते, सिंचन, मजूर, रासायनिक औषधे यासारख्या गोष्टींवर होणारा खर्च हा उत्पादन खर्च गृहित धरून त्यावरच हमीभाव निश्‍चित करण्यात आला. 

गेल्या दहा वर्षांत पिकांच्या हमीभावातही फारशी वाढ झाली नाही. दहा वर्षांपूर्वी भाताचा भाव 1 हजार रुपये होता. तो आता 1700 रुपये, ज्वारीचा 840 रुपयांवरून 2430, तर बाजरीचा 840 वरून 1950 रुपये दर झाला. दहा वर्षांपूर्वीचा उत्पादन खर्च व आताचा या पिकांचा उत्पादन खर्च यात किमान तिप्पट वाढ झाली आहे. शेतमजुरांची मजुरी, इंधनाचे दर, खतांच्या किमती यात गेल्या दहा वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. हमीभाव देताना या बाबींचा विचार करण्याची आवश्यकता असल्याचे मत शेतकरी वर्गातून व्यक्‍त होत आहे. 

पिकांचा उत्पादन खर्च काढताना तो अ2, अ2+ऋङ,  उ2 तीन पध्दतीने काढला जातो. पहिल्या पद्धतीत पिकांसाठी बियाणे, रासायनिक खर्च यासाठीचा खर्च तर दुसर्‍या पद्धतीत याशिवाय शेतकर्‍यांच्या कष्टाचे मोलही धरले जाते. उ2 मध्ये मात्र या दोन खर्चाशिवाय जमिनीचे आभासी भाडे, स्थायी भांडवलीय साधनसामुग्रीवरील व्याज हेसुद्धा मोजले जाते.

दृष्टिक्षेपात 2009 च्या तुलनेत या वर्षीचा हमीभाव (रुपये प्रतिक्विंटलमध्ये) (कंसात 2018 चा दर)

भात 1000 (1750), भात ग्रेड ए 1030 (1770), ज्वारी (संकरित) 840 (2430), ज्वारी (मालदांडी) 860 (2450), बाजरी 840(1950) मका 840(1700), नाचणी 915 (2897), तूर  2300 (5675) मूग  2760( 6975), उडीद 2520 (5600), भुईमूग  2100(4890), सूर्यफूल 2215 (5384), सोयाबीन 1350 (3399), तीळ  2850 (6249), कारळ 2405 (5877), कापूस (मध्यम धागा) 2500 (5150), कापूस (लांब धागा) 3000 (5450).

प्रत्यक्षात पाहिल्यास फक्‍त उत्पादन खर्च गृहित धरूनच हा हमीभाव निश्‍चित करण्यात आला आहे. यंदाच्या हंगामात गृहित धरण्यात आलेला 14 पिकांचा उत्पादन खर्च हा गेल्या हंगामातील उत्पादन खर्चापेक्षाही कमी आहे.