Thu, Jul 18, 2019 02:36होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : स्मशानभूमीला पावणेदोन लाख शेणी दान (Video)

कोल्हापूर : स्मशानभूमीला पावणेदोन लाख शेणी दान (Video)

Published On: Mar 01 2018 9:28PM | Last Updated: Mar 01 2018 9:29PMकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

कोल्हापुरात होळीच्या निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या होळी दान उपक्रमाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. अनेक तरुणांनी मोठ्या होळीला फाटा देत शेणी स्मशानभूमीला दान केली आहेत. सायंकाळपर्यंत जळवपास पावणे दोन लाख शेणी दान करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या कर्माचाऱ्यांनी दिली. कोल्हापुरात स्मशानभूमीत मोफत दहन व्यवस्था असल्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून तरुणांनी स्मशानभूमीला मदत करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरू झालेल्या या उपक्रमाला दर वर्षी तालीम मंडळांचा प्रतिसाद वाढतोच आहे.

आज, होळीच्या दिवशी सकाळपासूनच तालीम मंडळांचे कार्यकर्ते स्मशानभूमीत शेणी दान करण्यासाठी येत होते. सायंकाळपर्यंत कार्यकर्त्यांची ये-जा सुरूच होती. येत्या आठवड्याभरात आणखी शेणी गोळा करण्याचा उपक्रम शहरातील मोठ्या तालमी आणि मंडळांनी राबविला असून, पुढील आठवड्यात स्मशानभूमीतील शेणींमध्ये आणखी भर पडणार असल्याचे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.