Thu, May 23, 2019 05:05होमपेज › Kolhapur › गटशिक्षणाधिकारी कमळकर यांच्या बदलीतच ‘स्वारस्य’

गटशिक्षणाधिकारी कमळकर यांच्या बदलीतच ‘स्वारस्य’

Published On: Aug 28 2018 1:26AM | Last Updated: Aug 28 2018 12:43AMकोल्हापू : राजन वर्धन

मुख्याध्यापक मोरे यांना न्याय मिळवून देण्यासाठी सोमवारी (दि. 20)  सकाळी 11 वाजता शिक्षक संघटनांनी मोर्चाने पंचायत समितीवर धडक दिली. गटशिक्षण अधिकारी जी. बी. कमळकर यांच्या बदलीची मागणी  केली. यावेळी मोरे यांच्या मुलाला अनुकंपाखाली घेणे, अशैक्षणिक कामांना नकार देतील, अशी अपेक्षा होती. पण मुख्य प्रश्‍न बाजूलाच पडला आणि वैयक्‍तिक हेवेदावे काढून कमळकरांच्या बदलीचा आनंद घेण्याचा अजब प्रकार दिसून आला.

संघटनांनी दिलेल्या निवेदनातही कमळकरांच्या दोषावरच भर देण्यात आला. परिणामी, मोरेंना दुर्लक्षित करून त्यांच्या मृत्यूचे भांडवल करण्याचा प्रकार होऊ लागल्याचा आरोप शिक्षकांसह मोरे कुटुंबीय तसेच ग्रामस्थांतून होत आहे. 

मोरे कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीत प्रशासनाचा कसलाही उल्‍लेख करण्यात आला नाही. वास्तविक  कमळकर कागलमध्ये दीड वर्षे कार्यरत आहेत. जि.प.चे शिक्षण सभापती अंबरिश घाटगे, जि. प., पं. स. सदस्यांसह पदाधिकार्‍यांच्या सहकार्याने तालुका गुणवत्तेत आघाडीवर आणला. गतवर्षी शाळाबाह्य 269 मुलांना शाळेत घालण्याच्या आदर्श कामामुळे राज्य शासनाने त्यांचा गौरव केला आहे.  ते इतरांप्रमाणे ठराविक शिक्षकांच्या गाडीतून न जाता, स्वतःच्या दुचाकीने शाळेला भेट द्यायचे. सर्वांनाच त्यांनी कामाला लावले. 

मोर्चानंतर शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मोरे कुटुंबीयांच्या घरी सांत्वन करण्यासाठी गेले होते. तेथे ‘तुम्ही गटशिक्षण अधिकार्‍यांना सह-आरोपी करा’  असा सूचना केली; पण कुटुंबीयांनी तुमच्यातील कोणीतरी जबाब अथवा संघटनांचे लेखी पत्र मागितले. त्यावेळी मात्र या पदाधिकार्‍यांची पळताभुई थोडी झाली होती.   

लोकप्रतिनिधींनीही भान ठेवण्याची गरज
जिल्ह्यातील सर्वच संघटना कोणत्या ना कोणत्या नेत्यांशी बांधील आहेत. मोर्चात शिक्षकांनीही आपल्या पाठीशी असलेले राजकीय वलयही प्रकर्षाने रेखांकीत केले होते. शिवाय यातील एका संघटनेच्या पदाधिकार्‍याने तर संशयित आरोपींना या घटनेच्या अगोदर डिनरही केले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याचे भान ठेवून रक्‍कम पुरविणार्‍या संघटनांपेक्षा मुले घडविणार्‍या संघटनांना आपलेसे करण्याची गरज आहे.