Sat, Apr 20, 2019 16:09होमपेज › Kolhapur › राज्याभिषेकदिनी शिवछत्रपतींना अभिवादन

राज्याभिषेकदिनी शिवछत्रपतींना अभिवादन

Published On: Jun 07 2018 2:05AM | Last Updated: Jun 06 2018 11:18PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

सर्वसामान्य रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य निर्माण करणार्‍या शिवछत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 रोजी रायगडावर दिमाखात साजरा झाला. इतिहासाला कलाटणी देणार्‍या या घटनेच्या स्मृती जपण्याच्या उद्देशाने प्रतिवर्षी 6 जून रोजी सर्वत्र शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने सामाजिक, पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन केले जाते. बुधवारी सर्वत्र शिवराज्याभिषेकाचा सोहळा विविध  कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. 

प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस

शिवाजी पेठेतील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसमध्ये शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे चेअरमन व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी उदय देसाई, ए. व्ही. जाधव, सर्जेराव जाधव यांच्यासह सदस्य-सेवक उपस्थित होते. 

स्वातंत्र्य सैनिकांकडून अभिवादन

कोल्हापूर जिल्हा खादी व ग्रामोद्योग संघ, जिल्हा स्वातंत्र्य सैनिक संघटना, सर्वोदय मंडळ, संकुल शाळा, म. दुं. श्रेष्ठी समता हायस्कूल यांच्या वतीने शिवराज्याभिषेकदिन साजरा करण्यात आला. संघाचे अध्यक्ष सुंदरराव देसाई यांनी शिवछत्रपतींच्या स्फुर्तीदायी इतिहासाची माहिती सांगितली. प्रतिमा पूजनावेळी एस. एस. तुपद, सखाराम सुतार, प्रकाशराव चौगले, सर्जेराव काळे, बी. डी. चौगले, दादासोा जगताप, प्रा. सदाशिव मनुगडे, प्रा. आशाताई कुकडे, प्रा. डी. डी. चौगुले, प्रा. सुजय देसाई, बाबुराव पाटील, सविता देसाई, गीता गुरव, हिंदुराव पोवार, छाया भोसले, संभाजीराव चेंडक आदी उपस्थित होते. 

टाऊन हॉल उद्यानातील  पुतळ्यास अभिवादन

शिवराज्याभिषेकदिनी टाऊन हॉल उद्यानात छत्रपती राजाराम महाराज कालीन शिवछत्रपतींच्या संगमरवरी पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. शनिवार पेठ कलकुटकी गल्लीतील कृष्णा ग्रुपतर्फे परिसराची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात प्रशांत गवळी, संदीप गवळी, योगेश गवळी, प्रमोद गवळी, संतोष गवळी, शिवा गवळी आदी सहभागी होते.