Fri, Apr 26, 2019 03:22होमपेज › Kolhapur › ग्रामपंचायतींसाठी बिगुल जिल्ह्यात १८ गावी लढत

ग्रामपंचायतींसाठी बिगुल जिल्ह्यात १८ गावी लढत

Published On: Aug 24 2018 1:12AM | Last Updated: Aug 24 2018 12:59AMमुंबई/कोल्हापूर : प्रतिनिधी

राज्यातील कोल्हापूरसह 26 जिल्ह्यांतील 1 हजार 41 ग्रामपंचायतींसाठी येत्या दि. 26 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. दि. 27 सप्टेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 69 गावांत सरपंचपदासाठी पोटनिवडणूक होत  आहे. राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष जे. एस. सहारिया यांनी याची घोषणा केली. त्यामुळे या ठिकाणी आचारसंहिता सुरू झाली आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतींसाठी चुरशीच्या लढती होणार आहेत. भुदगरड तालुक्यातील निळपण, गडहिंग्लज तालुक्यातील आत्याळ, नांगनूर, तनवडी, हणमंतवाडी, शिरोळ तालुक्यातील आगर, टाकळी, कागल तालुक्यातील चौंडाळ, सुरुपली, सावर्डे खुर्द, करवीर तालुक्यातील केर्ले, चंदगड तालुक्यातील आमरोळी, गणुचीवाडी, मिरवेल, मौजे कारवे, मजरे कारवे, चंदगड, उत्साळी या गावांचा यामध्ये समावेश आहे.

निवडणुका होणार्‍या ग्रामपंचायतींची जिल्हावार संख्या पुढीलप्रमाणे- सांगली -3, सातारा - 49, सोलापूर - 61, रत्नागिरी - 19, सिंधुदुर्ग -  4, पुणे -  59, ठाणे - 6, रायगड - 121, नाशिक -24, धुळे- 83, जळगाव -6. अहमदनगर- 70, नंदूरबार - 66,  बीड- 2, नांदेड- 13, उस्मानाबाद - 5, लातूर - 3, अकोला -3, यवतमाळ - 3 , बुलढाणा - 3, नागपूर - 381, वर्धा - 15, चंद्रपूर -15, भंडारा- 5 व गडचिरोली- 5.

या निवडणुकीसाठी दि.  5 ते 11 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. दि. 12 रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. दि. 15 सप्टेंबर हा अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. त्याचदिवशी चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. दि. 26 रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. दि. 27 सप्टेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.