Mon, Apr 22, 2019 21:38होमपेज › Kolhapur › प्लास्टिक बंदीला जिल्ह्यातून बळ

प्लास्टिक बंदीला जिल्ह्यातून बळ

Published On: Mar 25 2018 12:37AM | Last Updated: Mar 24 2018 11:10PMकोल्हापूर : प्रतिनिधी

प्लास्टिक बंदीबाबत शासनाने अधिसूचना काढून आता कठोर पावले उचलली असली, तरी  कोल्हापूर जिल्हा परिषदेने मात्र पाच महिन्यांपूर्वीपासून ही मोहीम हाती घेतली आहे.  प्लास्टिक वापरणार नाही, असा ठराव जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 1,027 गावांनी गांधी जयंतीलाच केला आहे. यात कामचुकारपणा करणार्‍या गावांना कडक शासन करण्यासही जिल्हा परिषदेने मागे-पुढे पाहिलेले नाही. आतापर्यंत 112 ग्रामपंचायतींवर दंडात्मक कारवाई केली आहे.  

लोकांकडून चांगले बळ मिळत असल्याने प्लास्टिकमुक्‍त जिल्हा होण्याच्या दिशेने कोल्हापूरची वाटचाल सुरू झाली आहे. जि.प.ने शासन आदेशाची वाट न पाहता पाणी व स्वच्छता विभागाच्या नियंत्रणाखाली त्यासाठी नियोजनही सुरू केले. 

सप्टेंबरमध्ये याबाबतीत घोषणा  होऊन सर्व ग्रामपंचायतींना प्लास्टिक बंदी मोहिमेत सहभागी होण्याच्या सूचना दिल्या. 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीचे औचित्य साधून गावोगावी ठराव करण्यात आले. त्यासाठी कमिट्यांची स्थापनाही केली गेली. प्रबोधनात्मक मेळावे, फलक, स्पर्धा घेऊन प्लास्टिक न वापरण्याविषयी प्रबोधन केले गेले

Tags : Kolhapur, Kolhapur News, Government, strict action, notifying,  plastic ban