Tue, Jul 23, 2019 07:25होमपेज › Kolhapur › हिंदूंमधील हाफीज सईदचा बंदोबस्त करा : आंबेडकर

हिंदूंमधील हाफीज सईदचा बंदोबस्त करा : आंबेडकर

Published On: Jan 13 2018 5:27PM | Last Updated: Jan 13 2018 5:28PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

आपल्या देशात हिंदूंमध्ये असणाऱ्या 'हाफीज सईद'चा बंदोबस्त करण्याची गरज आहे, असे मत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे व्यक्त केले. जर, त्यांचा सरकारने बंदोबस्त केला नाही, तर जनतेवर त्यांचा बंदोबस्त करण्याची वेळ येईल, असेही अॅड. आंबेडकर म्हणाले. 

कोरेगाव भीमा प्रकरणानंतर कोल्हापुरात हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. त्यापार्श्वभूमीवर आज, प्रकाश आंबेडकर कोल्हापुरात आले होते. त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली.  आंबेडकर म्हणाले, 'महाराष्ट्रातील पोलिसच आपल्या देशाशी प्रामाणिक नाही. पोलिसांमधीलच अनेक अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली आहे. काल सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन एका विषयाला वाचा फोडली, तसे पोलिसांनी करण्याची गरज आहे.'  सध्याच्या स्थितीत भारताचा पाकिस्तान होऊ नये, याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे, असे मत अॅड. आंबेडकर यांनी व्यक्त केले.