Sun, May 26, 2019 16:48होमपेज › Kolhapur › शासकीय तंत्रनिकेतन आवारातील गवत पेटले

शासकीय तंत्रनिकेतन आवारातील गवत पेटले

Published On: Dec 12 2017 2:05AM | Last Updated: Dec 12 2017 1:04AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

शासकीय तंत्रनिकेतन आवारातील आठ एकरांतील गवत सोमवारी सायंकाळी पेटले. साडेपाचच्या सुमारास ही आग लागली. वार्‍यामुळे काही मिनिटांत आगीने रौद्ररूप धारण केले. महाविद्यालयाने याची माहिती अग्‍निशमन दलाला देताच दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. मोकळ्या माळावर वार्‍यामुळे आग सर्वदूर पसरत गेली. महाविद्यालयाच्या वतीने 1 कोटी वृक्ष योजनेतून लावलेल्या काही रोपांनाही आगीची झळ पोहोचली आहे. 

सायंकाळी सहाच्या सुमारास दोन बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवले. महाविद्यालयाच्या मैदानाजवळील 8 एकरांतील वाळलेले गवत आगीत जळाले आहे. प्राध्यापक प्रफुल्‍ल खेडकर, फिरायला येणारे अशोक पाटील, प्रा. सुरेश गवळी यांनीही आग विझविण्यासाठी मदत केली. आगीमुळे धुराचे लोट उंचावर गेल्याने बघ्याची मोठी गर्दी या ठिकाणी जमली होती. 

सिगारेटमुळे आग?

तंत्रनिकेतनच्या कंपौंडबाहेर काही तरुण सिगारेट ओढत थांबले होते. यातील एकाने सिगारेट गवतात फेकल्याने आग लागल्याचे मैदानावर खेळणार्‍या तरुणांनी सांगितले.आग पसरत असल्याचे पाहून हे सिगारेट ओढणारे तरुण पसारझाले. याची चर्चा घटनास्थळी रंगली होती.