होमपेज › Kolhapur › ‘गोकुळ’वर टीका करणार्‍यांनी ऊस दर जास्तीत जास्त द्यावा

‘गोकुळ’वर टीका करणार्‍यांनी ऊस दर जास्तीत जास्त द्यावा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

राज्यातील सर्व दूध संघ गायीच्या दुधाला 21 रुपये प्रतिलिटर दर देत असून, खासगी व्यापार्‍यांनी हा दर 20 रुपयेपर्यंत खाली आणलेला आहे; पण ‘गोकुळ’ने मात्र 25 रुपये प्रतिलिटर दर देण्याचा निर्णय घेऊन उत्पादकांना दिलासा दिलेला आहे. मात्र, ‘गोकुळ’ची ही कर्तबगारी विरोधकांच्या डोळ्यात खुपत असल्याने दूध उत्पादकांची दिशाभूल करून संघाला बदनाम करण्याचा डाव केला जात आहे. ‘गोकुळ’वर टीका करणार्‍यांनी ऊस दर जास्तीत जास्त द्यावा, असा आरोप ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी केला. डॉ. वर्गीस कुरियन जन्मदिनानिमित्त दूध उत्पादकांच्या कार्यशाळेच्या सांगता समारंभात बोलत होते. 

संस्था कमिशन 1 रुपये 20 पैसे व अंतिम दूध दर फरकात एक रुपये पाच पैसे याप्रमाणे ‘गोकुळ’ गायीच्या दुधास प्रतिलिटर 27 रुपये 25 पैसे इतका दर देत आहे. सद्यपरिस्थितीत इतका दर देणारा ‘गोकुळ’ हा महाराष्ट्रातील एकमेव दूध संघ असेल, असे पाटील यांनी स्पष्ट केले. कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी मार्गदर्शन केले.