Thu, Nov 15, 2018 20:07



होमपेज › Kolhapur › 'गोकुळ'वरून सुरू झाले पोस्टर वॉर

'गोकुळ'वरून सुरू झाले पोस्टर वॉर

Published On: Dec 05 2017 5:08PM | Last Updated: Dec 05 2017 5:08PM

बुकमार्क करा





कोल्हापूर : प्रतिनिधी

'पाहून गोकुळचा वटवृक्ष, करत्यात त्येला लक्ष, मुळावर घाव घालणार्‍या ‘त्या’ राजकारण्यापासून रहा तुम्ही दक्ष,' अशी टीका करणारा संदेश देणारी डिजीटल पोस्टर्स शहरासह जिल्ह्यात लावण्यात आली आहेत. गोकुळ दूध उत्पादक येत्या गुरुवारी (७ डिसेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. यासाठी सत्ताधारी गटाने व विशेषत: संचालकांनी कंबर कसली आहे. त्यामुळे मुंबईतील मनसे-काँग्रेसप्रमाणे कोल्हापुरात गोकुळ वरून पोस्टर वॉर सुरू झाल्याचे बोलले जात आहे. 

गायीच्या दूध खरेदी दरात दोन रुपये कपात केल्याच्या निषेधार्थ आमदार सतेज पाटील यांनी गोकुळवर मोर्चा काढला. हा मोर्चा सत्ताधारी गटाला चांगलाच जिव्हारी लागला आहे. या मोर्चाचा व मोर्चाचे नेतृत्व करणार्‍या सतेज पाटील यांचा निषेध करण्यासाठी संघाने प्रतीमोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. येत्या गुरुवारी हा मोर्चा दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे. 

मोर्चाला मोठ्या प्रमाणात दूध संस्था व नागरिकांनी उपस्थित रहावे, यासाठी गोकुळ संचालकांनी ठिकठिकाणी बैठका घेतल्या आहेत. आमदार पाटील यांच्या मोर्चात संचालक व संघाच्या नेत्यांवर स्टिकर्स, कार्टून आणि पोष्टरच्या माध्यमातून टिकाटिप्पणी केली होती. तशीच टिकाटिप्पणी आता निषेध मोर्चातून होण्याची शक्यता आहे. शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी, अशी डिजीटल लावण्यात आली असून, त्याची जोरदार चर्चा आहे.

Image may contain: text

पोस्टरवर आक्षेपार्ह मजकूर
‘गोकुळ’च्या सत्ताधार्‍यांकडून आयोजित करण्यात आलेल्या निषेध मोर्चातील पोष्टर्सची चर्चा चांगलीच रंगली आहे. आमदार सतेज पाटील यांनी काढलेल्या मोर्चात संघाच्या नेत्यांचा उंट व संचालकांचे चित्रण नंदी बैल असे रेखाटण्यात आले होते. आता निषेध मोर्चासाठीही आमदार सतेज पाटील यांची राजकारणातील बोका, अशा प्रकारचे चित्रण करण्यात आले आहे. गोकुळ दूध संघाला बदनाम करणार्‍या राजकारण्यातल्या बोक्याला रोखा, असे आवाहन या पोष्टर्सच्या माध्यमातून करण्यात आले आहे.