Mon, May 27, 2019 08:41होमपेज › Kolhapur › रंगनाथ हॉस्पिटलमध्ये गोकुळ टेस्ट ट्यूब बेबी सेंटर

रंगनाथ हॉस्पिटलमध्ये गोकुळ टेस्ट ट्यूब बेबी सेंटर

Published On: Dec 12 2017 2:05AM | Last Updated: Dec 12 2017 12:47AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

येथील प्रसिद्ध लॅप्रोस्कोपीतज्ज्ञ डॉ. प्रवीण हेंद्रे यांच्या रंगनाथ हॉस्पिटलमध्ये आता गोकुळ टेस्ट ट्यूब बेबी सेंटर हे अद्ययावत केंद्र सुरू झाले आहे. ताराबाई पार्कातील हॉटेल पर्लच्या पिछाडीस असलेल्या या सेंटरमध्ये सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. जोखमीच्या बाळंतपणासाठी हे एक आश्‍वासक पाऊल ठरणार आहे. 

येथे सात हजार दाम्पत्यांना टेस्ट ट्यूबद्वारे अपत्यप्राप्तीचा आनंद देणार्‍या सुरत येथील डॉ. पुर्णिमा नाडकर्णी यांच्याकडून येथे उपचार होणार आहेत. वंध्यत्व निवारण दुर्बीण शस्त्रक्रिया डॉ. हेंद्रे स्वतः करणार आहेत. त्यांना लॅप्रोस्कोपीतील सर्वोच्च मानल्या जाणार्‍या असोसिएशन ऑफ मिनिमल ऍक्सेस सर्जन ऑफ इंडिया (आसामी) या संस्थेच्या वतीने फेलोशिपने गौरवण्यात आले आहे. 1992 ला जिल्ह्यात पहिल्यांदा डॉ. हेंद्रे यांनी पेठवडगावमध्ये लॅप्रोस्कोपीची शस्त्रक्रिया केली. 

डॉ. हेंद्रे म्हणाले, ही प्रक्रिया खर्चिक असली तरी ती येथील रुग्णांना अधिक परवडावी, यासाठी इंदू-स्वरूप चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पहिल्या शंभर टेस्ट ट्यूब बेबींसाठी विशेष सवलत दिली जाणार आहे. यावेळी डॉ. रागिणी हेंद्रे, डॉ. संदीप पाटील आदी उपस्थित होते. 

शिबिराला प्रतिसाद 

सेंटरच्या उद्घाटनानिमित्त आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण व सल्ला शिबिराला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पंधरा डिसेंबरपर्यंत दुपारी एक ते सायंकाळी पाच या वेळेत शिबिर सुरू राहणार असून इच्छुकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी डॉ. हेंद्रे यांनी केले.