Sat, Sep 22, 2018 16:30होमपेज › Kolhapur › गोकुळ डिझेल घोटाळा सहा चालक निलंबित

गोकुळ डिझेल घोटाळा सहा चालक निलंबित

Published On: Apr 24 2018 1:27AM | Last Updated: Apr 24 2018 1:01AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा दूध संघातील (गोकुळ) वाहनांच्या डिझेल घोटाळाप्रकरणी संघाने 6 चालकांना निलंबित करून त्यांची चौकशी सुरू केली आहे. चौकशी अधिकारी म्हणून अंतर्गत लेखापरीक्षक धर्माधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘गोकुळ’कडे स्वत:ची पन्नासहून अधिक वाहने आहेत. या वाहनांना दोन पेट्रोल पंपांवर डिझेल भरण्यासाठी परवानगी आहे. या वाहनांपैकी एका जीपमध्ये कागलमधील एका पेट्रोल पंपावर टाकी फुल्ल करण्यात आली. मात्र, ही जीप दिवसभर कोठेच फिरली नाही.

रात्री  याच जीपमध्ये दुसर्‍या पेट्रोल पंपावर  डिझेल भरण्यात आले. ‘गोकुळ’च्या वाहन विभागातील अधिकार्‍यांच्या हा  प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर चौकशी केली केली. चौकशीअंती सहा चालकांनी हा प्रकार केल्याचे उघड झाले. यानंतर ‘गोकुळ’ प्रशासनाने या सहा चालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. दरम्यान, सोमवारी या सहा चालकांना निलंबित केले असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश प्रशासनाने अंतर्गत लेखापरीक्षक धर्माधिकारी यांना दिले आहेत.

Tags : Kolhapur, Gokul, Diesel, scam, suspended, six, drivers