Fri, Apr 26, 2019 03:27होमपेज › Kolhapur › आई अंबाबाई...सरकारला सुबुद्धी दे!

आई अंबाबाई...सरकारला सुबुद्धी दे!

Published On: Aug 01 2018 1:24AM | Last Updated: Aug 01 2018 12:54AMकोल्हापूर : प्रतिनिधी

‘आई अंबाबाई सरकारला सुबुद्धी दे... मराठा समाजाला आरक्षण दे....’ अशा शब्दांत साकडे घालून महाद्वार चौकात देवीची आरती व गोंधळ घालण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण व सवलती तातडीने मिळाव्यात, या मागणीसाठी मंगळवारी मराठा क्रांती संघटनेतर्फे करवीर निवासिनी अंबाबाई देवीला साकडे घालण्यात आले. या आंदोलनात महिला संघटना, आजी-माजी नगरसेवक, शिवाजी पेठेतील ज्येष्ठ मंडळी, तालीम मंडळांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी आरक्षण मिळेपर्यंत विविध मार्गांनी मराठा समाजातर्फे आंदोलनाची धार सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

हाती भगवे झेंडे, गळ्यात भगवे शेले, महिला कार्यकर्त्या भगव्या साड्या आणि डोक्यावर भगवी टोपी घालून आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे एकत्र येऊन चालत जात महाद्वारात ठिय्या मांडला. या ठिकाणी देवीचा गोंधळ, आरती झाल्यानंतर महापौर शोभा बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली महिला संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी मंदिराच्या गाभार्‍यात जाऊन देवीला साकडे घातले. यानंतर महाद्वार चौकात आंदोलनातील प्रमुखांची भाषणे झाली. 

महापौर बोंद्रे म्हणाल्या, आरक्षणासाठी सरकार मराठ्यांचे आणखी किती बळी घेणार आहे? मराठ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी आरक्षण मिळेपर्यंत आंदोलनाची धार कायम ठेवू. मराठा क्रांती संघटनेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी मराठा समाजाला सवलती देण्याच्या मुद्यावर अनेक वर्षे सरकारने वेळ काढला.त्यामुळे समाज रस्त्यावर उतरला. निवडणुकीसाठी मराठा समाजाची आठवण येणारे अनेक नेते आहेत; पण समाजाच्या आरक्षण प्रश्‍नाला नेतृत्व मागे सरते.आर्थिक निकषांच्या नादी न लागता सध्या सरकारने आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केले. 

महाद्वारला भगवी किनार....
हातामध्ये भगवे झेंडे घेतलेले कार्यकर्ते, भगव्या टोप्या तसेच भगव्या साड्यांमध्ये सहभागी झालेल्या महिला यामुळे महाद्वार चौकाला भगवी किनार प्राप्त झाली होती. महाद्वार चौकात ठिय्या मांडून बसलेल्या आंदोलकांनी परिसराचा ताबा घेतला होता. महिला लहान मुलांसह आंदोलनात सहभागी झाल्या होत्या तर तरुण कार्यकर्त्यांनी महाद्वार चौक भरून गेला होता. 

या ठिकाणी माजी आमदार सुरेश साळोखे,  देवस्थान समिती कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, माजी महापौर सई खराडे, जिजाऊ ब्रिगेडच्या सुनीता पाटील, भुयेवाडीच्या माजी सरपंच राणी पाटील, सुधा सरनाईक आदींसह  मान्यवरांची भाषणे झाली. 

आंदोलनात मराठा क्रांती संघटनेचे जिल्हाप्रमुख
 परेश भोसले, देवस्थान समिती सदस्या संगीता खाडे, मोहन साळोखे, राजू साळोखे, राजू सावंत, राहुल इंगवले,  विवेक महाडिक, मिलिंद साळोखे, माजी नगरसेवक रवी इंगवले, श्रीकांत भोसले, आकाश नवरुखे, कपिल सरनाईक, रावसाहेब इंगवले आदींह जिजाऊ ब्रिगेडच्या, भागिरथी महिला संस्था तसेच मराठा रणरागिणी आघाडीच्या महिला व शेकडो कार्यकर्त्यांसह शिवाजी पेठेतील नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते. भागीरथी महिला संस्था व भुयेवाडी, बानगे येथील नागरिकांकडून आंदोलनात सक्रिय सहभागी झाल्याचे पत्र देण्यात आले.

गंगावेशीत मानवी साखळी
‘आरक्षण आमच्या हक्काचे...’ अशा घोषणा देत संयुक्त शुक्रवार पेठ पंचगंगा परिसरातील मंडळे, तालीम संस्था व नागरिकांच्या वतीने मंगळवारी गंगावेस चौकात मानवी साखळी करून मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी केली. त्यानंतर घोषणा देत रॅलीने दसरा चौकात येऊन तेथे सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या ठोक आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी आंदोलनाची दखल घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सकल मराठा समाजाच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकात गेली आठ दिवस बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनालास पाठिंबा आणि गंगावेस चौकात मानवी साखळी असा संयुक्त कार्यक्रम संयुक्त शुक्रवार पेठ पंचगंगा परिसरातील तरुण मंडळे, तालीम संस्था व नागरिकांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. पंचगंगा परिसरातील सर्व मंडळांचे कार्यकर्ते व नागरिक सकाळी साडेदहाच्या सुमारास मस्कुती तलाव परिसरातील दत्त मंदिरासमोर जमा झाले.  हातात भगवे ध्वज घेऊन ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे’, ‘मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे’, अशा घोषणा देत महिला आणि कार्यकर्ते रॅलीने  गंगावेस चौकात आले. येथे मानवी साखळी करून शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. ‘मराठ्यांना आरक्षण नाकारणार्‍या सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.  घोषणा देत रॅली पापाची तिकटी, महापालिका चौकमार्गे रॅली दसरा चौकात आली. यावेळी रॅलीतील कार्यकर्ते व महिलांंच्या वतीने सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते दिलीप देसाई, वसंतराव मुळीक यांच्याकडे ठोक आंदोलनास पाठिंबा देणारे निवेदन देण्यात आले.

रॅलीत श्रीधर गाडगीळ, सतीश पाटील, उदय जगताप, नगसेविकास माधवी गवंडी, प्रकाश गवंडी, राकेश पोवार, संदीप पाटील, माणिक टेंगरे, जयेश पाटील, शुभम पाटील, सचिन शिंदे, अशोक पाटील, राहूल पाटील, केदार खाडे, इंद्रजित ओतारी, युवराज संकपाळ, शन्मुख डोमणे, संजय माळवी, नंदु प्रभावळे, राजू पाटील, मदन पोवार, अमर जाधव, सुजित पोवार, पिंटू काटकर, गणेश तोडकर, रियाज बागवान, इम्रान अत्तार, जहाँगीर अत्तार, अमोल संकपाळ, वैशाली पाटील, ज्योती जगताप, ताई भोसले, शकुंतला जाधव, शुभांगी पाटील, अभिजित सावंत, विरेंद्र मठपती आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.