कोल्हापूर : मैत्रिणीचे बाथरूममधील चित्रीकरण केल्याची क्लिप प्रसारित करण्याची धमकी देऊन दहा लाखांची खंडणी मागणार्या तरुणास करवीर पोलिसांनी अटक केली. प्रशांत धन्यकुमार रोकडे (वय 32, रा. आर. के. नगर) असे संशयित तरुणाचे नाव आहे. त्याला दोन दिवसांची कोठडी दिली आहे.
प्रशांतची सप्टेंबर 2016 पासून पीडित तरुणीशी मैत्री आहे. त्याने अनेकदा तिला घरी बोलावले होते. त्याने तिचे बाथरूममध्ये चित्रीकरण केले. ही क्लिप प्रसारित करण्याची धमकी तो देत होता. क्लिप डिलिट करण्यासाठी त्याने दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. तो वारंवार त्रास देत असल्याने पीडित तरुणीने पोलिसांत फिर्याद दाखल केली.