Fri, Jul 19, 2019 19:55होमपेज › Kolhapur › गॅस गळतीने स्फोट : महिला गंभीर जखमी

गॅस गळतीने स्फोट : महिला गंभीर जखमी

Published On: Dec 22 2017 12:21AM | Last Updated: Dec 22 2017 12:21AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

गॅस गिझरमधून झालेल्या गॅस गळतीचा स्फोट होवून प्रिया प्रशांत जोशी (वय 45, रा. राजोपाध्येनगर) गंभीर जखमी झाल्या. बुधवारी रात्री साडेनउच्या सुमारास राहत्या घरी ही घटना घडली. या घटनेत त्या 90 टक्के भाजल्या असून खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

प्रिया जोशी एस.टी. महामंडळात क्लार्क पदावर काम करतात. पतीचे निधन झाल्याने सासू आणि मुलासोबत राहण्यास आहेत. बुधवारी त्यांनी शाहूपुरीतील एका दुकानातून नवीन गॅस गिझर खरेदी केला होता. सायंकाळी साडेसात वाजता हा गॅस गिझर घरी जोडण्यात आला. 

रात्री साडेनउच्या सुमारास गॅस गळतीने घरात वास येवू लागला. प्रिया जोशी यांना बाथरुममधील गॅस गिझरमधून गॅस गळती होत असल्याची शंका आल्याने त्या बाथरुमकडे गेल्या. सर्वत्र पसलेल्या गॅसने अचानक पेट घेतल्याने स्फोटासारखा आवाज झाला. यात प्रिया जोशी भाजून जखमी झाल्या. ही घटना पाहताच त्यांच्या मुलाने आरडाओरडा करुन शेजार्‍यांना बोलावले. रात्री उशिरा त्यांना राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत त्या 90 टक्के भाजल्याचे त्यांचा भाउ निलेश प्रभूणे यांनी पोलिसांना सांगितले. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरु होते.