Thu, Jul 18, 2019 04:35होमपेज › Kolhapur › गारगोटी ग्रामपंचायतीत सत्तांतर, देसाई-पाटील आघाडीला १२ जागा

गारगोटी ग्रामपंचायतीत सत्तांतर, देसाई-पाटील आघाडीला १२ जागा

Published On: May 28 2018 3:42PM | Last Updated: May 28 2018 3:47PMगारगोटी : प्रतिनिधी

गारगोटी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राहुल देसाई व माजी आम.के.पी.पाटील आघाडीने सरपंचपदासह १२ जागा जिंकत सत्तांतर घडविले. सत्ताधारी आमदार प्रकाश  आबिटकर यांच्या आघाडीस ५ जागावर समाधान मानावे लागले. सरपंचपदाचे उमेदवार संदेश भोपळे हे विजयी झाले. आमदार आबिटकर आघाडीला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले.

गारगोटी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी ४ तर १७ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात होते. विद्यमान सरपंच, उपसरपंचांसह दोन सदस्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.   तर तालुक्यातील हणबरवाडीत सत्ता कायम राखण्यात आ.आबिटकर गटाच्या धनाजी खोत यांना यश आले. तर शिंदेवाडीत राहुल देसाई - प्रा.बाळ देसाई यांच्या आघाडीस सत्ता राखण्यात यश मिळाले. निष्णप-कुंभारवाडीत आ.आबिटकर गटाच्या सत्ता आली. कोंडोशीत आमदार आबिटकर गटास सत्ता मिळाली तर सरपंचपद माजी आमदार के.पी.पाटील - सत्यजित जाधव आघाडीस मिळाले. चांदमवाडीत सत्यजित जाधव - धनाजीराव देसाई गटास सत्ता व सरपंचपद मिळाले.
गारगोटी

श्री.केदारर्लिंग आघाडीचे विजयी उमेदवार असे (कंसात मिळालेली मते)

सरपंच संदेश पांडुरंग भोपळे (४१७५) सदस्य पदासाठी विजयी उमेदवार असे - सचिन सर्जेराव देसाई (९६८), सुकेशनी सतीश सावंत (९५९), आशाताई सुरेश भाट (९१३), रूपाली बजरंग कुरळे (७१६), जयवंत विठ्ठल गोरे (६२३), राहूल हिंदुराव कांबळे (९२५), प्रकाश शंकर वास्कर (९८०), अस्मिता नारायण कांबळे (८२०), सविता प्रशांत गुरव (७६१), अल्केश मधुकर कांदळकर (९७१), मेघा सचिन देसाई (७६२), स्नेहल विजय कोटकर (८५६)

आमदार प्रकाश आबिटकर यांच्या श्री.जोतिर्लिंग शहर विकास आघाडीचे उमेदवार असे

रणधीर रघुनाथ शिंदे (९१४), स्मिता अजित चोगले (९३०), सर्जेराव विष्णू मोरे (५६२), अनिता प्रदीप गायकवाड (७२१), सुशांत सुरेश सुर्यवंशी (६५८)  हणबरवाडी -  सरपंच - धनाजी महादेव खोत (३९९), जयवंत शंकर वडर (११३), विजय पांडुरंग खोत (१०८), राजश्री रमेश खोत (१०९) धोंडिबा दत्तू निढोरे (१८१), संतोष सखाराम खोत (१६५), मंगल हरिबा देसाई (१७४)

शिंदेवाडी ग्रामपंचायत -  सरपंच - संगीता बाजीराव चव्हाण (२९९), शशिकांत कृष्णात घुंगरे (७७), शोभा राजाराम चव्हाण (७६), तोंदलें सुभाष नागु (८०), माधुरी मारुती दबडे (९०) राजाराम कृष्णा चव्हाण (१३३), छाया निवास पाळेकर (१२९), दीपाली विजय सावंत (१४७) निष्णप कुंभारवाडी - सरपंच - भारती विलास पाटील (५०८), संदीप शिवाजी राऊळ (१६७), छाया कृष्णा राऊळ (१५४), मारुती भाऊ कांबळे (१५५), समिधा सुनील तेलंग (१८२), सचिन कृष्णा राऊळ (११७), पांडुरंग यशवंत तेलंग (१७८) चांदमवाडी - सरपंच - सुषमा संजय मोरे (१५६), पांडुरंग लक्ष्मण चांदम (५५), शिवाजी यशवंत चांदम (३६), शोभा दिनकर मोरे (३८), राजश्री उमाकांत चांदम (६५), पूजा दिनकर चांदम (६४)

कोंडोशी :  सरपंच - मारूती शामराव पाटील (६८५), सदस्य - मनोहर ज्ञानू मांगले (२६४), प्रज्ञा  प्रकाश भालेकर (२५७),प्रविण नामदेव बेळणेकर (३३१), महेश कृष्णा भुतूर्णे (३०६), जिजाबाई तुकाराम पाटील (३०८)

ग्रामपंचायतीची मतमोजणी श्री.मौनी विद्यापीठातील क्रीडा संकुलात मतमोजणी झाली. प्रांताधिकारी डॉ.संपत खिलारी, पोलिस उपअधीक्षक आर आर.पाटील, तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी, नायब तहसीलदार शीतल देसाई, व्ही.एन.बुट्टे, एच.आर.म्हेत्रे यांनी मतमोजणी प्रक्रिया पार पाडली.