Wed, Jun 26, 2019 11:45होमपेज › Kolhapur › बत्तीस वषार्र्ंनी शहरात धार्मिक महाउत्सव

बत्तीस वषार्र्ंनी शहरात धार्मिक महाउत्सव

Published On: Aug 23 2018 1:27AM | Last Updated: Aug 23 2018 12:16AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूरच्या महागणपतीला पहिला फुलांचा हार मुस्लिम बांधवांकडून येतो आणि घराघरांतील बाप्पांवर सजणारा रेशमी हारही... इथे चाँदसाबसोबत हिंदूंच्या घरी सावळाराम पंजाही प्रतिष्ठापित होतो... धार्मिक सलोखा आणि सर्वधर्मीयांचे सण उत्साहात साजरे करण्याची शाहूकालीन परंपरा इथे आजही अबाधित आहे. गणेशोत्सव व मोहरम हे दोन धार्मिक सण तब्बल 32 वर्षांनंतर यंदा एकाचवेळी येत असल्याने शहरातील तालीम मंडळांमध्ये एक वेगळाच उत्साह आहे. शहरातील बहुतांश तालमीत गणेशमूतीर्र्ंची प्रतिष्ठापना होते आणि मोहरमला पंजांची प्रतिष्ठापनाही होते. त्यामुळे 60 हून अधिक तालीम मंडळांत यंदा गणेशोत्सव व मोहरम असा धार्मिक महाउत्सव साजरा होणार आहे. 

मंगळवार, दि. 11 सप्टेंबरला मोहरमची पंजे प्रतिष्ठापना होणार आहे. तर बुधवारी हरितालिका गौरी पूजनाने गणेशोत्सव सुरू होत आहे. गुरुवार, दि. 13 सप्टेंबरला घराघरांसह तालीम मंडळांत श्री गणेशाची प्रतिष्ठापना होणार आहे. या काळात किमान सात दिवस गणेशमूर्ती व पंजे एकत्रित असणार आहेत. त्यामुळे खीर, मोदकासह यावर्षी मोहरमचे चोंगे आणि मलिदाही असेल. ढोल-ताशांच्या कडकडाटाबरोबरच पी ढबाक्...च्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात  सामाजिक व धार्मिक सलोख्याने उत्सव साजरा होणार आहे. 

दरवर्षी गणेशोत्सव आणि मोहरम हे दोन्ही सण ठराविक अंतराने येतात. त्यामुळे ते स्वतंत्रपणे साजरे होतात. यंदा दोन्ही एकाचवेळी असल्याने पोलिस प्रशासनावर बंदोबस्ताची जबाबदारी वाढली आहे. 32 वर्षांनी अशा पद्धतीने दोन्ही सण एकत्रित होणार असल्याने ज्या तालीम मंडळांत गणेशोत्सवासोबत पंजेही बसणार आहेत, त्यांच्याकडून धार्मिक महाउत्सवाची तयारी सुरू आहे. गणेशोत्सवात मुस्लिम बांधवांचा सहभाग आणि मोहरमात हिंदू भाविकांचा सहभाग असल्याने महाउत्सवात धार्मिक ऐक्याचे वेगळेपण पहायला मिळणार आहे. घरगुती गौरी-गणपती विसर्जनानंतर खत्तलरात्र असल्याने गणेशोत्सवातील देखावे आणि पंजे भेट मिरवणुका पाहण्यासाठी सारे शहर रस्त्यावर येणार हे नक्‍की.