Mon, May 20, 2019 18:46होमपेज › Kolhapur › जुगार अड्ड्यावर छापा; ३५ जण जेरबंद

जुगार अड्ड्यावर छापा; ३५ जण जेरबंद

Published On: Aug 14 2018 1:09AM | Last Updated: Aug 14 2018 12:55AMहातकणंगले : प्रतिनिधी

सांगली-कोल्हापूर मार्गावर हातकणंगले पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामलिंग फाट्याशेजारी एका घरामध्ये मध्यरात्री रंगलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी छापा टाकून 35 जुगार्‍यांना गजाआड केले. त्यामध्ये कोल्हापूर, सांगलीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. यावेळी चौघे जण पसार झाले.

कारवाईत दुचाकी, रोख रक्‍कम, जुगाराचे साहित्य असा तब्बल 33 लाखांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला. हातकणंगले पोलिसांना खबर लागू न देता जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्वत: कारवाई केल्याने पोलिस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. संशयितांत काही गुन्हेगार, तर काही राजकीय पक्षाशी संबंधित कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

तात्यासो भूपाल पाटील यांच्या घरामध्ये पंकजराज अनिल भास्कर (वय 28, रा. जवाहरनगर, कोल्हापूर) हा संगीतादेवी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ या नावाने जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती डॉ. देशमुख यांना मिळाली होती. त्यानुसार देशमुख यांनी सापळा रचून, रविवारी रात्री सहकार्‍यांसमवेत छापा टाकला. अचानक पडलेल्या छाप्याने जुगारी पळू लागले; पण पोलिसांनी जुगारींच्या मुसक्या आवळून त्यांना गजाआड केले. यामध्ये अनेक बड्या धेंडांचा समावेश आहे. ही कारवाई रविवारी रात्री उशिरा झाली असून, याबाबतची फिर्याद पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली आहे.

अटक केलेल्यांमध्ये संतोष शांतीलाल परमार (50, रा. कासार गल्ली, कोल्हापूर), सागर खंडू कांबळे (27, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर), महादेव शामराव भास्कर (57, रा. जवाहरनगर, कोल्हापूर), भगवान ज्ञानदेव हवालदार (रा. संभाजीनगर, कोल्हापूर), सुजित सतीश व्हटकर (29, रा. जवाहरनगर, कोल्हापूर), मधुकर बाबुराव गोरे (50, रा. राजारामपुरी, कोल्हापूर), सुधीर गोपाळराव पवार (61, रा. सरदार तालमीजवळ, कोल्हापूर), लक्ष्मण राऊत कांबळे (22, रा. राजेंद्रनगर, नवीन झोपडपट्टी, कोल्हापूर), काशिम इमाम मुल्ला (40, रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर), आण्णाप्पा सिदाप्पा साजणीकर (60, रा. राजारामपुरी,  कोल्हापूर), शुभम सुनील सूर्यवंशी (23, रा. बिंदू चौक कोल्हापूर), अर्जुन चंद्रभान पवार (30, रा. माकडवाला वसाहत, कोल्हापूर), जावेद कादर मुजावर (30, रा. आळते), गणेश मकरंद कदम (21, रा. जवाहरनगर कोल्हापूर), वसंत मार्‍याप्पा पुजारी (38, रा. विचारेमाळ, कोल्हापूर), शफी राजेसाब शेख (53, रा. गांधीनगर), रतन शंकर पचेरवाल (58, रा. ताराराणी कॉलनी कोल्हापूर), जोतिराम अनिल भास्कर (23, रा. जवाहरनगर कोल्हापूर), रणजित बिरू धनगर (31, रा. धनगर गल्ली, हातकणंगले), सुनील आनंदा पाटील (27, रा. हातकणंगले), विजय आण्णाप्पा लोखंडे (42, रा. रुकडी), अजित बाळासो कोरवी (23, रा. इचलकरंजी), संतोष दिनकर माने (37, रा. हातकणंगले), संजय सुरेश कोरवी (30, रा. जवाहरनगर, इचलकरंजी),  महंमदगौस रफिक नाईकवडी (21, रा. बागणी, ता. वाळवा), विष्णू काशिनाथ सोनटक्के (42, रा. माळभाग कोरोची), संजय बाबुराव म्हसकर (54, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर), राजू मार्तंड लोंढे (44, रा. लक्ष्मीनगर, रुकडी), ताजुद्दीन मकबुल बेदडे (31, रा. बागणी, ता. वाळवा),  दिगंबर राजाराम पाटील (27, रा. हातकणंगले), मुबारक मौला नाईकवडी (49, रा. बागणी, ता. वाळवा), बाबासो भीमराव कोरवी (43, रा. हातकणंगले), प्रकाश कामू चव्हाण (40, रा. इचलकरंजी), तात्यासो भूपाल पाटील (रा. आळते), पंकजराज अनिल भास्कर (रा.जवाहरनगर, कोल्हापूर) यांचा समावेश आहे. 

जुगार अड्ड्याच्या बाहेर जुगार्‍यांच्या आलिशान मोटारी व मोटारसायकली मिळून आल्या. ही सर्व वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यात 11 दुचाकी, पाच चारचाकी वाहने, मोबाईल असा एकूण 33 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला. या कारवाईने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कारवाईचा स्थानिक पोलिस अधिकार्‍यांनीही धसका घेतला आहे. आठवड्यापूर्वीच येथील हॉटेलवर हातकणंगले पोलिसांनी छापा टाकून जोडप्यांना पकडले होते. तो एक सूचक इशारा होता; पण स्थानिक पोलिसांनी अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष करून, त्यांना पाठबळ दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे अखेर जिल्हा पोलिस प्रमुखांनीच नियुक्‍तीनंतर कारवाईचा पहिला तडाखा देत जिल्ह्यातील सर्वच पोलिसांना सूचक इशारा दिला. त्यामुळे आता तरी ज्या-त्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे बंद होणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.