Sat, Mar 23, 2019 18:28होमपेज › Kolhapur › हॉटेल इंटरनॅशनलमध्ये जुगार खेळताना पकडले

हॉटेल इंटरनॅशनलमध्ये जुगार खेळताना पकडले

Published On: Dec 03 2017 1:29AM | Last Updated: Dec 03 2017 1:06AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

स्टेशन रोडवरील हॉटेल इंटरनॅशनलमध्ये रुम नंबर 101 मध्ये सहा जणांना तीन पानी जुगार खेळताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून रोख 45 हजार, मोबाईल हँडसेट असा सुमारे 1 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यात घेतलेल्यांत माजी नगरसेवक शिवाजी कवाळे, रणजित परमार यांच्या मुलांचाही समावेश आहे. 

पोलिसांनी ओंकार शिवाजी कवाळे (रा. बागल चौक), कुणाल रणजित परमार (रा. कासार गल्ली, गुजरी), अनुप श्रीपाल देवकुळे (रा. माळी कॉलनी), अमित वीरचंद ओसवाल (शिवाजी पेठ), अंकुश प्रतापचंद शहा (भेंडे गल्ली), प्रेम सुनील नांगरे (शिवाजी चौक) तसेच हॉटेलचा मॅनेजर विक्रम सदाशिव कदम (रा. मुक्तसैनिक वसाहत) यालाही ताब्यात घेतले. हॉटेल मालक राहुल शेषमल कर्णावट (रा. मुक्तसैनिक वसाहत) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला.