Mon, Mar 25, 2019 17:48होमपेज › Kolhapur › नववर्ष स्वागतासाठी गगनबावडा सज्ज  

नववर्ष स्वागतासाठी गगनबावडा सज्ज  

Published On: Dec 28 2017 1:33AM | Last Updated: Dec 28 2017 12:37AM

बुकमार्क करा
गगनबावडा ः प्रतिनिधी 

 गरिबांचे महाबळेश्‍वर म्हणून ओळखला जाणारा निसर्रम्य गगनबावडा सन 2017 ला गुडबाय करण्यासाठी व 2018 चे उत्साही स्वागत करण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून गगनबावडा परिसरास भेट देणार्‍या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यंदा 31 डिसेंबर रविवार येत असल्याने पर्यटकांना तो पर्वणीचा दिवस ठरणार आहे. मांसाहारी खवय्यांना तर यामुळे अधिकच पर्वणी ठरणार आहे. नववर्षाची स्वागत करणारी 31 डिसेंबरची रात्र गगनबावडा व परिसरात साजरी करण्यासाठी येणार्‍या हौशी पर्यटकांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील अन्य ठिकाणी असणारा पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी आणि गगनबावड्याच्या शांत रमणीय वातावरणात नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गगनबावड्याला अधिक पसंती मिळू लागली आहे. येथील गगनगडाच्या ऐतिहासिक परिसरासह करूळ भुईबावडा घाटातील काही मोक्याचे पॉईंटस् या दिवशी बहरून जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 31 डिसेंबर म्हटलं की मांसाहार व मद्य हे आलेच, तांबड्या-पांढर्‍या रश्शाचा आस्वाद घेण्यासाठी येथील मोक्याचे पॉईंटस् पर्यटकांनी आधीपासूनच हेरून ठेवले आहेत.

मध्याच्या धुंदीत तांबड्या-पांढर्‍या रश्शावर ताव मारत 31 डिसेंबरला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाचे जल्लोषी स्वागत करण्यासाठी गगनबावडा येथील खासगी हॉटेल, लॉजिंग सज्ज असून येथील सर्व शासकीय, निसशासकीय विश्रामगृह तसेच खासगी रमणीय बंगले, फार्महाऊस (विशेषता धरण स्थळावरील) वर नशिली मजा करण्यासाठी आधीच बुक करण्यात आली आहेत. या ठिकाणी जल्लोषी वातावरणात 2017 ला गुडबाय करत 2017 चे वेलकम करण्यात येणार आहे. दरम्यान, नववर्षाच्या उत्साही स्वागतावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.