Thu, Nov 15, 2018 20:11



होमपेज › Kolhapur › मुख्याध्यापकाचे विद्यार्थिनीशी अश्‍लील वर्तन

मुख्याध्यापकाचे विद्यार्थिनीशी अश्‍लील वर्तन

Published On: Sep 06 2018 1:41AM | Last Updated: Sep 06 2018 1:41AM



गडहिंग्लज : प्रतिनिधी

शिक्षकदिनीच गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा फासण्याचा प्रकार गडहिंग्लजमध्ये घडला आहे. एका शाळेच्या मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीशी अश्‍लील चाळे करण्याचा प्रयत्न केल्याने शिक्षकदिनीच मुलीच्या नातेवाइकांनी शाळेमध्ये येऊन या मुख्याध्यापकाला चांगलीच तंबी दिली. 

याबाबत अधिक माहिती अशी, मुख्याध्यापकपदाचे ‘भा’न नसलेल्याने गेल्या काही दिवसांपासून आपल्याच शाळेत शिकत असलेल्या दहावीच्या मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. आठ दिवसांपूर्वी तर या मुख्याध्यापकाने आपल्या केबिनमध्ये बोलावून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. यामुळे भांबावलेल्या मुलीने दोन दिवस शाळेत येण्याचे टाळले. महिनाअखेरच्या दिवशी या मुख्याध्यापक महाशयांनी पुन्हा या मुलीला दुपारी शाळा संपल्यानंतर केबिनमध्ये बोलावले.

हा प्रकार तिने आपल्या नातेवाइकांना सांगितल्यामुळे संतप्‍त झालेल्या नातेवाइकांनी बुधवारी शाळेत येऊन मुख्याध्यापकाला दम भरला. यावेळी कॉलेजच्या काही मुली या मुख्याध्यापकाला प्रसाद देण्याच्या तयारीत होत्या. मात्र, शिक्षकदिन असल्याने त्या थांबल्याची चर्चा आहे. संस्थेच्या वरिष्ठांच्या कानावर हा विषय गेल्यावर आजचा दिवस थांबा, उद्या मात्र त्याला नक्‍कीच शिक्षा करू या, असे सांगण्यात आले आहे. शिक्षकदिनीच घडलेल्या या घटनेची गडहिंग्लजमध्ये दिवसभर चर्चा सुरू होती.