Sun, Mar 24, 2019 08:15होमपेज › Kolhapur › कृष्णा, पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी नृसिंहवाडी, औरवाडसह आठ गावांमध्ये उत्स्फूर्त बंद

कृष्णा, पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी नृसिंहवाडी, औरवाडसह आठ गावांमध्ये उत्स्फूर्त बंद

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 16 2018 11:35PMनृसिंहवाडी : प्रतिनिधी

पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या दूषित पाणीप्रश्‍नी नृसिंहवाडी, औरवाडसह आठ गावे बंद ठेवून बुधवारी आंदोलनाला  सर्वपक्षीय  पाठिंबा देण्यात आला. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील मरगाई चौकात अनंतराव धनवडे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे तीन तास अनेक मान्यवरांनी  प्रदूषणप्रश्‍नी मनोगत व्यक्‍त करून आंदोलन केले. 

यावेळी शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, उद्यानपंडित गणपतराव पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्या परवीन पटेल, पंचायत समिती सदस्या रूपाली मगदूम, अनंतराव धनवडे, दादेपाशा पटेल, रणजित पाटील, सुकुमार किणिंगे आदी उपस्थित होते.