Fri, Sep 21, 2018 09:26होमपेज › Kolhapur › आजपासून बीडला नॉनस्टॉप शिवशाही

आजपासून बीडला नॉनस्टॉप शिवशाही

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

औरंगाबाद ते बीडला जाणार्‍या प्रवाशांचा प्रतिसाद पाहता त्यांना एसटी महामंडळाने वातानुकूलित सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत मंगळवारपासून (दि. 27) सिडको बसस्थानकातून बीडला शिवशाही बसची सेवा सुरू होणार आहे. ही बस सकाळी 7, 8 आणि 9 वाजता सिडको बसस्थानकातून सोडण्यात येणार असल्याची माहिती आगारप्रमुख प्रवीण भोंडवे यांनी दिली. 

सिडको बसस्थानकातून बीडला जाणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी आहे. सध्या या मार्गावर साध्या बस आहेत. या गाड्यांना प्रचंड गर्दी असते. या मार्गावर वातानुकूलित गाड्या सोडल्या तर त्यालाही तसाच प्रतिसाद मिळण्याची आशा एसटी महामंडळाला आहे. आजपासून प्रायोगिक तत्त्वावर औरंगाबादेतून तीन व बीडहून तीन शिवशाही बस सोडण्यात आल्या आहेत. या गाड्या सकाळी 7, 8, 9 ला सिडको बसस्थानकातून रवाना होतील आणि दुपारी 2, 3, 4 अशा एक-एक तासाच्या अंतराने रवाना होणार आहेत.या गाड्या दिवसभरात सहा फेर्‍या करणार आहेत. तर याच वेळेस बीडहून औरंगाबादकडे शिवशाही बसेस येणार आहेत. ही सेवा औरंगाबाद ते बीड व बीड ते औरंगाबाद अशी नॉनस्टॉप राहणार आहे. 

Tags : Aurangabad, Aurangabad News, From today, Beed, nonstop, Shivshahi


  •