Tue, Mar 19, 2019 15:35होमपेज › Kolhapur › चंदगड नगरपंचायतीसाठी चौथ्यांदा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार

चंदगड नगरपंचायतीसाठी चौथ्यांदा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार

Published On: Aug 23 2018 1:27AM | Last Updated: Aug 23 2018 12:08AMचंदगड ः प्रतिनिधी

चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी आज चंदगड येथील रवळनाथ मंदिरात झालेल्या बैठकीत चंदगड ग्रामपंचायत निवडणुकीवर सलग चौथ्यांदा बहिष्कार घालण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. 

दि.  30 ऑगस्टपर्यंत शासनाने नगरपंचायतीचा दर्जा दिला नाही, तर होणार्‍या सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकून उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा कृती समितीचे अध्यक्ष शिवानंद हुंबरवाडी यांनी दिला. 

हुंबरवाडी म्हणाले, नगरपंचायतीचा अध्यादेश काढण्यात आलेला नाही. मराठा समाजाचे आरक्षणाचे निमित्त पुढे करून सरकारने महिनाभर चंदगडवासीयांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. नगरविकास मंत्री रणजित पाटील यांनी विधान परिषदेत आ. सतेज पाटील यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना दि. 30 जुलैपर्यंत चंदगड नगरपंचायतीचा प्रश्‍न मार्गी लावण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते. महिना उलटला तरी सरकारने ठोस भूमिका घेतलेली नाही, असे सांगितले. यावेळी चौथ्यांदा होणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे ठरले. यावेळी जि. प. सदस्य सचिन बल्‍लाळ, बाबुराव हळदणकर, राजेंद्र परीट, अरुण पिळणकर, सुरेश सातवणेकर, फिरोज मुल्‍ला, तजमुल फणीबंद, सुधीर देशपांडे, रवींद्र कसबले, चंद्रकांत दाणी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.