Wed, Nov 14, 2018 10:05होमपेज › Kolhapur › ऊसतोड टोळीच्या नावाखाली चार लाखांची फसवणूक

ऊसतोड टोळीच्या नावाखाली चार लाखांची फसवणूक

Published On: Dec 23 2017 2:06AM | Last Updated: Dec 23 2017 12:27AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

ऊसतोडीसाठी वीस जणांची टोळी देतो, असे सांगून 4  लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी नितीन शांतीलाल चखाले (रा. चिखली, आष्टी, बीड) याच्यावर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 29 सप्टेंबर 2017 रोजी त्याने पैसे घेतल्याची फिर्याद सदाशिव रामचंद्र माने (वय 55, रा. सरनोबतवाडी) यांनी दिली. 

फिर्यादी सदाशिव माने यांनी ऊस वाहतुकीसाठी संकेश्‍वर साखर कारखान्याशी करार केला. ऊसतोडीसाठी त्यांना टोळी हवी असल्याने ते संशयित नितीन चखाले याला भेटले. अनामत रक्‍कम म्हणून माने यांनी 4 लाख रुपये चखाले याला दिल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, या रकमेबाबत विचारणा केली असता चखाले याने फसवणूक केल्याची फिर्याद माने यांनी दिली.