Thu, Mar 21, 2019 11:15होमपेज › Kolhapur › सुरजा-गोंद्या टोळीतील चौघांनी पोलिसांच्या ताब्यातून काढला पळ 

सुरजा-गोंद्या टोळीतील चौघांनी पोलिसांच्या ताब्यातून काढला पळ 

Published On: May 18 2018 11:34AM | Last Updated: May 18 2018 11:34AMकोल्हापूर: प्रतिनिधी 

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांसह राष्ट्रीय महामार्ग व सीमाभागात आलिशान वाहने रोखून व्यापाऱ्यासह पर्यटकांना लूटणाऱ्या सुरजा-गोंद्या टोळीतील चौघे जण शुक्रवारी पहाटे शाहुवाडी पोलिसांच्या ताब्यातून पळून गेले. टोळीप्रमुख सूरज ऊर्फ कैलास दबडे, गोविंद माळी, ओंकार सूर्यवंशी आणि विराज कारंडे यांनी पहाटे चौकी तोडून गज वाकवून पळ काढला. 

सुरजा-गोंद्या टोळी टोळीतील या चौघांना शाहुवाडी पोलिसांनी कळंबा जेलमधून ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. या चौघांविरुद्ध खंडणी, वाटमारी, जबरी चोरी, बेकायदा शस्त्रे कब्जात बाळगून दहशत माजविल्याप्रकरणी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह कर्नाटकात गंभीर गुन्हा दाखल आहेत.    

या चौघांचा शोध घेण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच शोधपथके देखील रवाना करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Image may contain: 4 people, text