Tue, Mar 26, 2019 07:53होमपेज › Kolhapur › माजी कृषिमंत्री शरद पवार यांची बाबासाहेब पाटील यांच्या घरी भेट

माजी कृषिमंत्री शरद पवार यांची बाबासाहेब पाटील यांच्या घरी भेट

Published On: Feb 12 2018 1:53AM | Last Updated: Feb 11 2018 11:38PMपोर्ले तर्फ ठाणे  : वार्ताहर

माजी कृषिमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘मामाच्या गावाला भेटी’ दरम्यान कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व केडीसीसी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर) यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन चहा-पाणी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बांधणीमध्ये मोलाचे कार्य असलेबद्दल त्यांचे कौतुक केले.

गेळिवडे गावाला जाण्याअगोदर सकाळी 8.30 वाजता आसुर्ले येथे पाटील यांच्या घरी भेट दिली व त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस करून चर्चा केली. यावेळी पवार यांचे जंगी स्वागत केले. आसुर्ले गावाच्या वेशीपासून पाटील यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा लोक उभा राहून जल्लोषीत स्वागत केले. त्यांचे औक्षण केले.  बाबासाहेब पाटील यांनी पाटील कुटुंबीयांच्या वतीने पवार यांना शाल, श्रीफळ, फेटा आहेर देऊन सन्मानित केले.

यावेळी शरद पवार यांनी जि. प. सदस्या प्रियंका पाटील यांनी अल्पावधीत राजकारणात चांगली मजल मारल्याबद्दल कौतुक केले व त्यांच्याशी चर्चा करून दिल्लीमध्ये शिक्षणासाठी आहात तर दिल्लीत माझी भेट घ्या, असे आवर्जुन सांगितले.

या भेटी दरम्यान तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांना देखील भेटून त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण केला. पवार यांच्या भेटीमुळे कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.  यावेळी पवार यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. या दरम्यान बाबासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोणतीही जबाबदारी पेलण्यास मी तयार आहे, असे सांगितले. यावेळी कोतोली फाटा ते गेळिवडे गावापर्यंत झालेल्या स्वागताचे के. पी. पाटील व सुनील तटकरे यांनी  कौतुक केले.

या भेटीदरम्यान हसन मुश्रीफ, निवेदिता माने, राजू लाटकर, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, आर. के. पोवार,  आदिल फरास, मदन कारंडे, संतोष धुमाळ, दाजी पाटील, निवास ढोले, गणपती चेचर, अंगद शेवाळे, सर्जेराव सासने, शिवाजीराव काळे, अ‍ॅड. प्रकाश देसाई, अजित पाटील (माले), तसेच सरपंच भगवानराव पाटील, दगडू पाटील, संध्यादेवी कुपेकर, राजेखान जमादार, संगीता खाडे, धनंजय महाडिक, पी. एन. पाटील, आदी उपस्थित होते.