Fri, May 24, 2019 02:26होमपेज › Kolhapur › रंकाळ्यावर परदेशी पाहुण्यांचे आगमन

रंकाळ्यावर परदेशी पाहुण्यांचे आगमन

Published On: Jan 09 2018 1:33AM | Last Updated: Jan 09 2018 1:15AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर शहराच्या जैवविविधतेचा ठेवा मानला जाणारा रंकाळा आता विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा नंदनवन बनला आहे. देशी, स्थानिक पक्ष्यांसह परदेशी पक्ष्यांची संख्याही रंकाळा तलाव परिसरात वाढू लागली आहे. विविध रंगांचे, आकाराचे बागडणारे आणि विहारणाने पक्षी पाहण्यासाठी अभ्यासकांची गर्दी वाढू लागली आहे.

रंकाळा तलाव शहराचे सौंदर्यस्थळ आहे. त्यामुळेच पर्यटकांचेही  आकर्षणबिंदू आहे. शहराच्या वर्दळीतही रंकाळ्याची जैवविविधता टिकून आहे. देशी-विदेशी अनेक प्रजातींच्या पक्ष्यांच्या उपस्थितीने या जैवविविधतेवर मोहोर उमटवली आहे. अभ्यासकांच्या निरीक्षणात 105 प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद या परिसरात झाली आहे. जवळपास 27 पक्षी सातासमुद्रापार म्हणजे रंकाळ्यावर आले आहेत. या परदेशी पाहुण्यांनी या परिसराची श्रीमंती वाढली आहे.  

नकटा बदक,  कॉमन पोचार्ड, बेल्लॉनची फटाकडी,  मोठा रंगीत पाणलाव, थापट्या बदक आदींचा  समावेश आहे.  गळाबंद पाणलाव, सोनपंखी कमळपक्षी   दीर्घकाळ दिसून येतात. चक्रवाक या पक्ष्याचे दर्शनही नियमित होऊ लागले आहे. स्वरल, रंगीत करकोचा, मोर शराटी, शेकाट्या यांची संख्याही चांगली दिसून येते. यातील अनेक प्रजातींचा अधिवास रंकाळा परिसर आहे. त्यामुळे हे पक्षीवैभव जपण्याची गरज निर्माण झाली आहे.

देश-विदेशातील पक्षी अभ्यासकांसाठी पर्वणी

रंकाळा तलाव परिसर हा देश-विदेशातील पक्षी अभ्यासकांसाठी महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. थंडीच्या सध्याच्या काळात तर ही पर्वणीच ठरणार आहे.