Sun, May 19, 2019 14:41
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › नाहक इर्ष्येपोटी जीवाशी ‘खेळ’ नको...

नाहक इर्ष्येपोटी जीवाशी ‘खेळ’ नको...

Published On: Apr 07 2018 2:00AM | Last Updated: Apr 07 2018 12:35AMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

खेळाच्या मैदानात नाहक इर्ष्येपोटी अनेकदा खिलाडूवृत्ती धाब्यावर बसविली जाते. ‘बळी तो कान पिळी’ या न्यायाने प्रतिस्पर्धी खेळाडू कसा बाद होईल यासाठी जाणून-बूजण प्रयत्न केले जातात. ऑलिम्पिक सारख्या सर्वोच्च स्पर्धेत अशा प्रकारचे खेळ करणार्‍यांना ‘मायनस’ (वजा)  गुण देऊन स्पर्धे बाहेर केले जाते. मात्र, स्थानिक पातळीवर अद्यापही प्रत्येक स्पर्धेत अनेकदा धसमुसळा खेळच पाहायला मिळतो. यामुळे खेळाडूंना दुखापतीसह जीवावर बेतणारा खेळ पाहाण्याची वेळ क्रीडाप्रेमींवर येते. 

मानवी समाज संस्कृतीत युद्ध प्रकारातून खेळांची निर्मिती झाली आहे. खेळांना प्रदीर्घ अलिखीत परंपरा आहे. यामुळे बहुतांशी खेळ रांगडे आहेत. कालओघात खेळ प्रकारांची संख्या कित्येक  पटीने वाढली आहे. एकट्या शालेय खेळांची संख्या सव्वाशेच्या घरात गेली आहे. खेळांच्या वाढत्या संख्येपाठोपाठ स्पर्धांचीही संख्या सात्तत्याने वाढत चालली आहे. शहरस्तर, जिल्हास्तर, विभागस्तर,  राज्यस्तर, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांबरोबरच निमंत्रितांच्या, खेळ संघटनांच्या, विविध निमित्ताने होणार्‍या स्पर्धांचे आयोजन वर्षभर केले जाते. यामुळे क्रीडा क्षेत्राचा विकास झपाट्याने होत आहे. खेळ व खेळाडूंची संख्या सात्तत्याने वाढत आहे.

वैयक्तिक सुरक्षितता गरजेची
 कुस्ती, फुटबॉल, कबड्डी, हॉकी, खो-खो, जिम्नॅस्टिक, मल्लखांब, रग्बी, ज्युदो-कराटे, मर्दानी खेळ, युद्धकला यासह तत्सम खेळांत खेळाडूंना होणार्‍या अपघातांची संख्या मोठी आहे. याला प्रतिस्पर्धी खेळाडूच्या अखिलाडू, धसमुसळेपणाबरोबरच स्वत: त्या खेळाडूंची बेपर्वाही तितकीच कारणीभूत ठरत आहे. वैयक्तिक सुरक्षिततेबाबत अनेक खेळाडू सजग नसल्याचे चित्र आहे. प्रत्येक बारीक गोष्टींबाबत खेळाडूंनी प्रशिक्षक, तज्ज्ञ आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणे गरजेचे आहे. कधीही उठून मैदानात उतरण्याचा अततायीपणा न करता योग्य प्रकारचा वॉर्मअप, दैनंदिनी सराव अशा गोष्टींना प्राथमिकता देणे गरजेचे आहे. 

खिलाडूवृत्तीसह नियमांचे पालन गरजेचे...
एकीकडे असे सकारात्मक चित्र असताना दुसरीकडे खिलाडूवृत्ती सोडूण धसमुसळा खेळ करण्याच्या प्रकारातही वाढ होत आहे. टेक्निक किंवा स्कीलचा गेम न करता केवळ ताकतीचा खेळ करण्यावर भर दिला जात आहे. प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान मोडूण काढण्यासाठी चुकीच्या पद्धतीचा खेळ होताना दिसत आहे. यामुळे अनेक खेळाडू विविध प्रकारच्या दुखापतींनी ग्रस्त होत आहेत. हा प्रकार एकूणच क्रीडा क्षेत्रासाठी हानिकारक आहे. यामुळे खेळाडूंसह प्रत्येक संबंधित घटकाने खिलाडूवृत्तीसह नियम व आचारसंहितेचे पालन करणे अत्यावश्यक आहे. 
 

Tags : players,  rules, games