होमपेज › Kolhapur › मासे झाले स्वस्त

मासे झाले स्वस्त

Published On: Dec 17 2017 1:28AM | Last Updated: Dec 16 2017 11:59PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर बाजारात गेल्या दोन दिवसांत माशांची आवक 50 टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे माशांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सुरमईचा दर 600 रुपयांवरून 400 रुपयांवर आला आहे.

रत्नागिरी, मालवण, देवगड व आसपासच्या परिसरातून कोल्हापुरात समुद्री माशांची आवक होते. पहाटेच्या सुमारास मासे मटण मार्केटमध्ये येतात.  वादळामुळे बंपर मासळी सापडली. त्यामुळे कोल्हापुरात सध्या माशांची आवक वाढत आहे. सध्या दररोज 3 ते 4 टन माशांची आवक होते. 

ओखी वादळापूर्वी सुरमईचा दर 600 रुपये प्रतिकिलो होता. सध्या सुरमईचा दर 400 रुपये प्रतिकिलो असा झाला आहे. म्हणजे सुरमईच्या दरात 35 टक्के घट झाली आहे. बांगडा 160 रुपये प्रतिकिलो या दराने विकला जात होता. सध्या बांगड्याचा दर 120 रुपये प्रतिकिलो असा आहे. 400 रुपये किलो असणारी कोळंबी 200 ते 240 रुपये किलो दराने सध्या विकली जात आहे. बोंबीलचा किलोचा दर 160 रुपयांवरून 120 रुपयांपर्यंत खाली आला आहे. सौंदाळ्याचा दर मात्र टिकून आहे. 240 रुपये प्रतिकिलोचा दर होता तो आहे तसाच आहे. पापलेटचा  दर 600 रुपयांपासून 1 हजार रुपये किलो आहे. पापलेटच्या दरात कोणतीही घसरण झालेली नाही.