Thu, Sep 20, 2018 14:26होमपेज › Kolhapur › कोल्‍हापुरात दुमजली इमारतीला आग, १० लाखाचे नुकसान

कोल्‍हापुरात दुमजली इमारतीला आग, १० लाखाचे नुकसान

Published On: Feb 25 2018 11:49AM | Last Updated: Feb 25 2018 11:49AMकोल्‍हापूर : प्रतिनिधी

लक्ष्मीपुरी पानलाईन येथील जैन मंदिरशेजारील अरविंद श्रीपतराव पिसे यांच्या दुमजली लाकडी इमारतीला आज सकाळी साडे सात वाजता अचानक आग लागली. या इमारतीमध्ये राहणार्‍या रंगकाम करणार्‍यांचे चार लाखाचे साहित्यासह दहा लाखाचे नुकसान या आगीत झाले आहे. अग्नीशमन दलाच्या गाड्यांनी आग अटोक्‍यात आणली. 

या ठिकाणी रविवारचा आठवडा बाजार असल्याने व आगीची घटना घडल्याने नागरिकांची धावपळ उडाली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्‍यक्‍त करण्यात येत आहे.