Wed, Aug 21, 2019 19:34होमपेज › Kolhapur › पन्हाळा येथे तटबंदीस आग

पन्हाळा येथे तटबंदीस आग

Published On: Jan 02 2018 1:32AM | Last Updated: Jan 02 2018 1:19AM

बुकमार्क करा
पन्हाळा  : प्रतिनिधी 

येथील कलावंतीण सज्जाच्या जवळील तटबंदीस सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास आग लागली. वार्‍याच्या झोताबरोबर आग वाढत गेल्याने तटबंदीवरील गवत पेटले. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. 

आगीची माहिती समजताच नागरिकांनी पन्हाळा पालिकेच्या अग्‍निशमन दलाला पाचारण केले. अग्‍निशमन दलाने ही आग तातडीने आटोक्यात आणली. यामध्ये नंदू कांबळे, मंदार नायकवडी, सुभाष पवार, विलास उदाळे यांचा समावेश होता.

या दिवसात वाळलेल्या गवतावर काही पर्यटक सिगारेट ओढून टाकत असतात. तसेच अनेक हुल्लडबाज तरुण मुद्दाम  गवताला आग  लावतात, असे प्रकार येथे अनेक वेळा घडले आहेत. अशा प्रकारांमुळे झाडे जळतात. पक्षी व त्यांची घरटी जातात. याचे भान पर्यटकांनी ठेवावे व पन्हाळगडावर तटबंदीस कोठेही आग लागल्यास तातडीने पालिकेला कळवावे, असे आवाहन नगराध्यक्षा रूपाली धडेल यांनी केले आहे.