Mon, Aug 19, 2019 11:50होमपेज › Kolhapur › मेपासून पाण्याचे बिल भरा दारातच

मेपासून पाण्याचे बिल भरा दारातच

Published On: Apr 21 2018 1:00AM | Last Updated: Apr 21 2018 12:12AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर शहरातील पाच प्रभागांत पाणीपट्टीचे स्पॉट बिलिंग सुरू करण्यात आले आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून 1 मेपासून संपूर्ण शहरात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. पाण्याची बिले देणार्‍या कर्मचार्‍यांकडेच वसुलीसाठीचे सॉफ्टवेअर देण्यात येणार आहे. संबंधित नागरिक रोख रक्‍कम भरू शकतात किंवा कार्ड स्वॅप करून बिल भागवू शकतात, असेही त्यांनी सांगितले. 

तसेच शहरात 750 कंटेनर (कचरा कोंडाळे) असून अनेकवेळा त्यातील कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे महापालिकेने नवे सॉफ्टवेअर तयार केले असून, प्रत्येक कंटेनरला जीओ टँगिंग करण्यात आले आहे. शहरातील सर्व रस्त्यावरील कंटेनरमधील कचरा कोंडाळे उचलण्यासंबंधी मार्ग ठरवून दिवसही निश्‍चित करण्यात आले आहेत. 

दरम्यान, दुधाळी नाल्यावरील 17 एम.एल.डी. क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया केंद्र लवकरच सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  

‘रोकेम’च्या प्रोजेक्टची आयआयटीकडून तपासणी

कोल्हापूर शहरात दररोज निर्माण होणार्‍या 180 ते 200 कचर्‍यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. लाईन बझारजवळ सुरू असलेल्या या प्रकल्पाच्या डिझाईनपासूनची सर्व तपासणी मुंबईतील आयआयटी संस्थेतील तज्ज्ञाकडून करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात संस्थेशी चर्चा झाली आहे. प्रकल्प सुरू झाल्यानंतरही प्रत्येक तीन महिन्यांनंतर प्रकल्पातील सर्वांची तपासणी केली जाणार असल्याचेही आयुक्‍त चौधरी यांनी सांगितले.

 

Tags ; kolhapur, kolhapur news, water bill, door,