Wed, Apr 24, 2019 01:52



होमपेज › Kolhapur › खतांच्या किमतीत 20 टक्के वाढ!

खतांच्या किमतीत 20 टक्के वाढ!

Published On: Jul 12 2018 1:41AM | Last Updated: Jul 12 2018 12:58AM



कोल्हापूर : राजेंद्र जोशी

इंधनाच्या भडकलेल्या किमती आणि कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे खतांच्या किमतीत सुमारे 20 टक्के वाढ झाली आहे. यामध्ये स्फुरद आणि पालाशजन्य खतांच्या किमतीवर थेट परिणाम झाला असून, सरकारी नियंत्रणामुळे युरियाच्या किमती स्थिर असल्या, तरी सरकारतर्फे खत उत्पादकांना दिल्या जाणार्‍या अनुदानात वाढ करावी लागणार आहे.

डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) खताच्या किमतीत 20 टक्के वाढ झाली आहे. डीएपी खताची 50 किलोची पिशवी 1290 रुपयांना झाली आहे, तर म्युरेट ऑफ पोटॅश (एमओपी) खताच्या किमतीत 13 टक्के वाढ होऊन प्रतिपिशवी 700 रुपये झाली आहे. युरिया खताच्या किमती सरकार निश्‍चित करत असल्याने, त्याच्या किमती वाढणार नाहीत. परंतु, अनुदानापोटी खत उत्पादक कंपन्यांना द्यावयाच्या रकमेत वढ होईल. याचा अर्थ युरिया खताच्या किमतीतील वाढीचा बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे.