Sun, Jul 21, 2019 01:23होमपेज › Kolhapur › सरपंच पतीच्या विरोधात उपोषण

सरपंच पतीच्या विरोधात उपोषण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

उजळाईवाडी : प्रतिनिधी

उजळाईवाडी (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीत सत्ताधारी महाडिक गटाकडून मनमानी कारभार चालू असून विद्यमान सरपंच सुवर्णा माने यांचे पती डी. जी. माने विरोधी गटाला विचारात न घेता कारभार करतात. त्याचबरोबर शनिवारी गावसभेपूर्वी सरपंच यांचे पती व पुतण्या यांनी पाणीपुरवठा कर्मचारी नारायण दळवी याला शिवीगाळ करत अंगावर धावून गेल्याबद्दल सतेज पाटील गटाच्या वतीने निषेध नोंदवण्यासाठी बुधवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

ग्रामपंचायत सदस्या प्रतिभा पोवार म्हणाल्या, सरपंच सुवर्णा माने व ग्रामविकास अधिकारी काकासो पाटील यांच्यामध्ये सरपंच पती खुर्ची टाकून गावचा मनमानीपणे कारभार करत आहेत. हा सर्व महिला वर्गाचा अपमान असून ते निषेधार्ह आहे. चौदावा वित्त आयोग तसेच विविध विकास कामे हेतूपुरस्सर विरोधी सदस्यांना डावलून केली जात आहेत. हे वेळीच थांबले नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.

यावेळी राजू माने, उत्तम आंबवडे, तंटामुक्‍त समिती अध्यक्षा नायकू बागणे, महादेव माने यांनी आपल्या मनोगतात सरपंच पतीच्या कारभारावर नाराजी व्यक्‍त केली. ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंचायत समिती सदस्या सुनीता कांबळे यांनीही या उपोषणात उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला.

Tags : Kolhapur, Kolhapur News, Fasting, against, sarpanch, husband 


  •