Wed, Feb 20, 2019 21:53होमपेज › Kolhapur › अथणी शुगर्सच्या विरोधात उपोषण

अथणी शुगर्सच्या विरोधात उपोषण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

गारगोटी : प्रतिनिधी

अथणी शुगर्स प्रशासनाच्या विरोधात तांबाळे येथील जमीनदार कामगारांनी आपल्या कुटुंबांसह भुदरगड तहसील कार्यालयासमोर आज एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. आंदोलनकर्त्यांनी केलेल्या जोरदार घोषणाबाजीने हुतात्मा चौक परिसर दणाणून सोडला. इंदिरा गांधी भारतीय महिला साखर कारखाना उभारणीसाठी जमिनी दिलेल्या कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे व तशी ऑर्डर द्यावी. जमिनी दिलेल्या लोकांच्या वारसांना सेवेत घ्यावे. फक्‍त तांबाळे युनिटसाठीच हे कामगार काम करतील. शेतकर्‍यांच्या मुलांना सेवेत सामावून घ्यावे, यासह विविध मागण्यांसाठी तसेच हंगाम संपल्यानंतर कामावरून कमी केल्याच्या कारणावरून कारखान्याचा मुख्य रस्ता बंद करून कारखान्याची कोंडीकेली. 

गेले चार दिवस हे आंदोलन सुरू असून आज भुदरगड तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण कामगारांनी त्यांच्या कुटुंबासह केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने आंदोलन स्थळी मोठी गर्दी झालीहोती.यावेळी बोलताना कामगार प्रतिनिधी कॉ. सम्राट मोरे म्हणाले, अथणी शुगर्सने  जमीनदार कामगारांवर अन्याय केला असून कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला. 

या आंदोलनास भाजपचे तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस विश्‍वनाथ कुंभार, रणजित पाटील आदींनी पाठिंबा दर्शविला. सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत कारखाना प्रशासनकाडून चर्चेसाठी कोणीही आले नसल्याने कामगारांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली.यावेळी लाल बावटा कामगार युनियनचे अध्यक्ष यशवंत देसाई, उपाध्यक्ष सुनील लाड, सचिन देसाई, आश्राप्पा देसाई यांच्यासह कामगार, महिला आंदोलनात सहभागी झाले होते.

Tags : Kolhapur, Kolhapurv News, Fasting, against, Athani Sugars


  •