Thu, Jul 18, 2019 04:05होमपेज › Kolhapur › एफ.आर.पी. तीन महिने थकली

एफ.आर.पी. तीन महिने थकली

Published On: Mar 25 2018 12:37AM | Last Updated: Mar 24 2018 11:01PMकुडित्रे : प्रा. एम. टी. शेलार

साखर कारखान्यांचे गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आहेत. काही कारखान्यांनी गळीत हंगाम उरकला; पण तीन महिन्यांपासून काही कारखान्यांनी एफ.आर.पी. थकवली आहे. त्यामुळे साखर कारखानदारांबद्दल शेतकर्‍यांमध्ये प्रचंड रोष आहे. साखर कारखानदारी, एफ.आर.पी. आणि शेतकर्‍यांची सद्यस्थिती याचा वेध घेणारी मालिका आजपासून...

यंदाच्या हंगामात कारखानदारांनी ऊस उत्पादकांना गृहीत धरून एफ.आर.पी. अधिक 100 रुपये प्रतिटन ऊस तुटल्यावर व 100 रुपये दोन महिन्यांनंतर असा स्वयंघोषित फॉर्म्युला घोषित केला. विशेष म्हणजे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खा. राजू शेट्टी व कारखानदार यांच्या उपस्थितीत हा तोडगा मान्य झाला. कारखाने सुरू झाले; पण दीड महिन्यानंतर कारखानदारांनी प्रतिटन 2,500 रुपये अ‍ॅडव्हान्स देणे सुरू केले. एफ.आर.पी. सरासरी प्रतिटन 2,700 असताना ही बेकायदेशीर मोडतोड केली. एफ.आर.पी. थकीत ठेवणार्‍या कारखान्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. मात्र, शासन गप्पच आहे.  

एफ.आर.पी. किती?

2017-18 च्या हंगामात पाहिल्या 9.5 टक्के उतार्‍याला प्रतिटन 2,550 रुपये अधिक पुढील एक टक्‍का उतार्‍याला 268 रुपये प्रतिटन अशी एफ.आर.पी. आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा 2017-18 च्या हंगामातील सरासरी साखर उतारा 12.33 टक्के आहे. त्यानुसार जिल्ह्याची सरासरी एफ.आर.पी. प्रतिटन 2,730 रुपये येते. आता कारखानदारांनी प्रतिटन 2,500 रुपयांची दिलेली उचल एफ.आर.पी.पेक्षा सुमारे 230 रुपयांनी कमी आहे. त्यामुळे डिसेंबर 2017 पासून पुढची हंगाम संपेपर्यंतची ऊस बिले एफ.आर.पी.पेक्षा प्रतिटन 230 रुपयांनी कमी आहेत.     

Tags :  Kolhapur, Kolhapur News, FRP , Tired, three months,  Sugar, Factory,