Wed, Sep 26, 2018 11:00होमपेज › Kolhapur › शनिवार वगळता  बँका चार दिवस बंद

शनिवार वगळता  बँका चार दिवस बंद

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

शनिवार दि.31 मार्च वगळता बँका सलग चार दिवस बंद राहणार आहेत. सलग सुट्ट्यांमुळे गुरुवार दि. 29 मार्च रोजी महावीर जयंती व शुक्रवार  दि. 30 मार्च रोजी गुडफ्रायडे मुळे बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. मार्च अखेरमुळे 31 मार्च रोजी बँकांचे कामकाज सुरू राहणार आहे. रविवारी साप्‍ताहिक सुट्टी व सोमवार 1 एप्रिल रोजी बँकांचे कामकाज सुरू राहणार असले तरी ग्राहकांसाठी बंद राहणार आहेत.  

31 मार्चमुळे आर्थिक व्यवहारांची पूर्तता तसेच आर्थिक वर्ष समाप्‍तीच्या  ताळेबंद पत्रकाची बँकांमध्ये कामाची लगबग सुरू असल्याने बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी होत आहे.  कर्ज वसुलीबरोबरच टार्गेट पूर्ण करण्यासाठी बँक कर्मचार्‍यांची धावपळ सुरू आहे. ई-बँकिंगवरील आर्थिक व्यवहारात वाढ झाली असली तरी मोठ्या कंपन्यांना आर्थिक व्यवहारांसाठी बँकांवरच अवलंबून राहावे लागत आहे. मार्चअखेरीस बँकांची लगबग सुरू असतानाच  महावीर जयंती व गुडफ्रायडेमुळे बँका सलग दोन दिवस बंद राहणार आहेत.  यादिवशी बँकांमध्ये कोणतेही कामकाज होणार नाही. आर्थिक व्यवहारांसाठी ग्राहकांना एटीएमवर विसंबून राहावे लागत आहे. एरव्ही 31 मार्चमुळे बँकांचे कामकाज बंद असते; पण शनिवारी हे कामकाज व आर्थिक व्यवहार नियमितपणे सुरू राहणार आहेत. 

साप्‍ताहिक सुट्टीमुळे रविवारी बँका बंद राहणार आहेत. सोमवार दि. 1 एप्रिल रोजी आर्थिक ताळेबंदासाठी बँकांचे अंतर्गत कामकाज सुरू राहणार आहे; पण ग्राहकांसाठी बँक बंद राहणार आहेत. त्यामुळे शनिवार वगळता बँका सलग चार दिवस बंद राहणार आहेत. दरम्यान, आज बुधवारी व गुरुवारी आर्थिक व्यवहारांसाठी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.

Tags : Kolhapur, Kolhapur News, Except, Saturday, Banks, close, four, days


  •