Fri, Jan 18, 2019 17:36होमपेज › Kolhapur › पर्यावरण दिनी सांडपाणी थेट पंचगंगेत

पर्यावरण दिनी सांडपाणी थेट पंचगंगेत

Published On: Jun 06 2018 1:42AM | Last Updated: Jun 06 2018 1:13AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जागतिक पर्यावरण दिन सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरा होत असताना मंगळवारी जयंती नाल्यातील सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत होते. पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी एकिकडे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मात्र सांडपाणी आज थेट मिसळत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्‍त करण्यात आला. प्रजासत्ताक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी याबाबतची माहिती ई-मेलच्या माध्यमातून मुख्यमंत्री, पर्यावरणमंत्री तसेच महसूल अधिकार्‍यांना पाठवली असल्याचे सांगितले. 

आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्त सर्वत्र सकारात्मक उपक्रमांची सुरुवात करण्यात आली. प्रदूषण करणार नाही असे संकल्प अनेक ठिकाणी करण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर आज सकाळपासून मात्र जयंती नाल्याचे पाणी प्रक्रिया न होताच नदीत मिसळत होते. रात्रीपर्यंत हे सांडपाणी नदीत मिसळत होते. सांडपाणी नदीत मिसळू नये यासाठी कार्यवाही करण्याची मागणी प्रजासत्ताकच्या वतीने महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आज करण्यात आली. मात्र, सायंकाळपर्यंत याबाबत ठोस कार्यवाही न झाल्याने यासंदर्भातील माहिती संस्थेने जबाबदार यंत्रणेकडे ई-मेलच्या माध्यमातून पाठवली.