Sat, Apr 20, 2019 09:52होमपेज › Kolhapur › लोखंडी टाकी डोक्यात पडून उद्योजकाचा मृत्यू

लोखंडी टाकी डोक्यात पडून उद्योजकाचा मृत्यू

Published On: Aug 27 2018 1:14AM | Last Updated: Aug 27 2018 1:05AMउजळाईवाडी : प्रतिनिधी

कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत रविवारी सकाळी क्रेनचा हूक तुटून टाकी डोक्यात पडल्याने तरुण उद्योजकाचा मृत्यू झाला. प्रभाकर दिलीप शिरगावे (वय 32, रा. गडमुडशिंगी) असे त्याचे नाव आहे. 

दिलीप शिरगावे यांचा ओंकार पावडर कोटिंग कारखाना आहे. वडिलांना कामामध्ये हातभार लागावा म्हणून प्रभाकर कारखान्यात काम करत होते. रविवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कारखान्यात आले. क्रेनला लोखंडी टाकी अडकवून दुसरीकडे ठेवत असताना, अचानक क्रेनचा हूक तुटला आणि टाकी प्रभाकर यांच्या डोक्यात पडली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना कागल येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

प्रभाकर मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांचा मित्रपरिवारही मोठा होता. रक्षाबंधन सणादिवशी ही घटना घडल्याने गडमुडशिंगीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी असा परिवार आहे.