Sun, Jun 16, 2019 12:41
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › अतिक्रमण मोहीम : रिंगरोडवर मंडळाच्या कार्यकर्त्यांशी वादावादी

अतिक्रमण मोहीम : रिंगरोडवर मंडळाच्या कार्यकर्त्यांशी वादावादी

Published On: Dec 17 2017 1:28AM | Last Updated: Dec 17 2017 12:28AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

महापालिका अतिक्रमण विभागाने राबविलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेंतर्गत शनिवारी झालेल्या कारवाईवेळी फुलेवाडी रिंगरोडवरील शाहू चौक मित्र मंडळाची इमारत हटविण्यावरून मंडळाचे कार्यकर्ते आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. या वादावादीमुळे कारवाईत काही काळ अडथळा निर्माण झाला.  

दरम्यान, या कार्यकर्त्यांना दोन दिवसांची मुदत देण्यात आली. सोमवारपर्यंत स्वत:हून अतिक्रमण न हटविल्यास सोमवारी सकाळी या इमारतीस जेसीबी लावण्यात येईल, असे अधिकार्‍यांनी सांगितले. त्याबाबतचे लेखी पत्रच मंडळ कार्यकर्त्यांकडून घेण्यात आले. चिवेबाजार येथून सकाळी या मोहिमेस सुरुवात करण्यात आली. 

राधानगरी रोड, संकल्पसिद्धी ते जुना वाशी नाका रोड ते पश्‍चिम बाजू रोडकडील क्रशर चौक, बोंद्रेनगर,  फुलेवाडी रिंगरोड या भागात मोहीम राबविण्यात आली. यावेळी 78 केबीन आणि 57 होर्डिंग्ज काढण्यात आली. 

ही कारवाई आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या आदेशानुसार अतिरीक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या नियंत्रणाखाली उपशहर अभियंता रमेश मस्कर, एस. के. माने, आर. के. जाधव, हर्षजित घाटगे, अतिक्रमण पथक प्रमुख पंडित पोवार, कनिष्ठ अभियंता संजय नागरगोजे, सुनील भाईक, सागर शिंदे, आर. एस. कांबळे,  महानंदा सुर्यवंशी, सर्वेअर दत्तू पारधी, मुकादम कर्मचारी यांनी केली.दोन जेसीबी, तीन डंपर, एक लाईट बुम, एक कटर वेल्डिंग ट्रॉलीसह जुना राजवाडा पोलिस अग्निशमन दल कर्मचारी यांच्या सहकार्याने केली.