Thu, May 23, 2019 04:27होमपेज › Kolhapur › भरपावसातही मराठा आरक्षणासाठी एल्गार

भरपावसातही मराठा आरक्षणासाठी एल्गार

Published On: Aug 14 2018 1:09AM | Last Updated: Aug 14 2018 12:45AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

मराठा समाज बांधवांना न्याय द्या, त्यांच्या आडवे याल तर खबरदार, मराठा समाजाला अडचण येईल तेव्हा आम्ही तुमच्या पाठीशी ठाम आहोत, असा पक्‍का निर्धार ख्रिस्ती समाज बांधव आणि हज यात्रेला निघालेल्या मुस्लिम समाज बांधवांनी केला. ऐतिहासिक दसरा चौकात सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनात सोमवारी दिवसभरात विविध ग्रामस्थ, संघटनांनी पाठिंबा देत तीव्र शब्दात सरकार विरोधात आक्रोश व्यक्‍त केला. एकविसाव्या दिवशीही भरपावसात मराठा आरक्षणासाठीचा उत्साही ठिय्या सुरू आहे. 

जिल्ह्यातील गावागावांतून मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी तरुणांसह ग्रामस्थांची गर्दी होत आहे. शांततेने येऊन ग्रामस्थ ठिय्या आंदोलनात सहभागी होत सरकारचा निषेध नोंदवत आहेत.आरक्षणासाठी आत्महत्या करून नका, असा संदेश ही यावेळी दिला जात आहे.आत्महत्या करू नका, लढू,  जिंकूया मैदानातून पळ काढायचा नाही. सरकारला आरक्षणासाठी नामोहरम करायला लावयचेच, असा निर्धार तरुणाईने आपल्या भाषणातून व्यक्‍त केला. गेले दोन दिवस पावसाची रिपरिप सुरू आहे, अशा परिस्थितीतही आंदोलकांचा उत्साह कायम आहे. 

हसूर दुमाला (ता. करवीर) येथील ग्रामस्थांनी दसरा चौकात येऊन ठिय्या आंदोलन केले. अनेक तरुणांनी भाषणातून आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. मराठा रियासत ग्रुप, महाराष्ट्र युवा मंच, हनुमान तरुण मंडळ, आमदार निवास ग्रुप, शाहू तालीम, शाहू सम्राट, बालगोपाल तरुण मंडळ, नवहिंद तरुण मंडळ, शिव-शंकर तरुण मंडळ, ओम गणेश तरुण मंडळ, सिद्धेश्‍वर तरुण मंडळ, एम.एस.बी.ग्रुप, बाबा स्पोर्टस्, नागराज ग्रुप, सहजसेवा मित्र मंडळ, ओम बॉईज, आपलं भजन तरुण मंडळ, स्वामी समर्थ सेवा मंडळ, युवा प्रतिष्ठान, जय मल्हार तरुण मंडळ, सॅटपॅट बॉईज, शिवकल्याण राजा तरुण मंडळ, अण्णा भाऊ साठे तरुण मंडळ आदी मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

ख्रिस्ती युवा शक्‍ती संघटनेने मराठा आरक्षणास पाठिंबा दिला. यावेळी शमुवेल परब, राजेश पवार, रमेश भोसले, के.पी.सोनवणे, अनिल शिरोलीकर, दयानंद लोंढे, सागर भोरे, भिकाजी सावंत, उमेश चांदणे, नितीन माळी, प्रणिता माळी, सविता मानवाणे, ज्योती खोडवे, नंदा जगदाळे, रोहिणी सावंत, छाया पोवार, अनिता अवघडे, अतुल घाडगे, दिनानाथ कदम, विल्सन नाथम यांच्यासह ख्रिस्ती समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाने मराठा आरक्षणास पाठिंबा. यावेळी संतोष आयरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. निवृत्त पोलिस कल्याण संस्था शाखा कोल्हापूर यांनी आरक्षणासाठी पाठिंबा देऊन ठिय्या मांडला. यावेळी बी. एम. पाटील, सुरेश पवार, डी.एस.लोळराखे, एस.एस.कणसे, बी.जी.आंबी, बी.ए.चाचे, प्रकाश यादव, जो. भू. मोहिते आदी उपस्थित होते. संभाजीगर परिसरातील नागरिकांनी ठिय्या आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी उदय बेडेकर, नागेश आवळे, राम कांबळे, दादू कांबळे, अजय सुतार, मारुती पाटील, सुरज तडाखे, प्रमोद दाभाडे आदी उपस्थित होते.