Fri, Nov 16, 2018 09:25होमपेज › Kolhapur › वेळवट्टी येथील शेतात हत्तीचा सुळा सापडला 

वेळवट्टी येथील शेतात हत्तीचा सुळा सापडला 

Published On: Jul 02 2018 1:51AM | Last Updated: Jul 01 2018 11:56PMआजरा ः प्रतिनिधी

वेळवट्टी (ता. आजरा) येथील धनाजी राणे यांच्या मालकीच्या शेतामध्ये रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हत्तीचा जमिनीमध्ये घुसलेल्या अवस्थेत एक सुळा सापडला. हत्तीकडून या भागात नुकसानीचे सत्र सुरूच आहे. रविवारी संध्याकाळपासून हत्तीने वेळवट्टी येथील पिकांचे मोठे नुकसान केले आहे.

गेले पंधरा दिवस हत्तीचा वेळवट्टी, मसोली, हाळोली या भागांमध्ये वावर आहे. रात्रभर शेतजमिनीमध्ये हत्ती धुमाकूळ घालत असल्याने शेतकर्‍यांनी येथील राखण बंद केली आहे. रविवारी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास हत्तीचे राणे यांच्या शेतामध्ये आगमन झाले.कुत्र्यांच्या ओरडण्यामुळे हत्ती दूर झाडीमध्ये निघून गेला.  हत्ती जंगलांमध्ये निघून गेल्यानंतर डॉक्टर राणे हे नुकसानीची पाहणी करत असताना जमिनीमध्ये मातीत घुसलेल्या स्थितीत हत्तीचा एक सुळा आढळून आला.

याबाबत परिक्षेत्र वनाधिकारी सुनील लाड यांच्याशी संपर्क साधला असता हत्तीचे सुळे गळून पडणे हा त्याच्या हा त्यांच्या जीवन चक्राचा एक भाग आहे, असे त्यांनी सांगितले. राणे यांनी सापडलेला हा सुळा वन विभागाच्या स्वाधीन केला आहे.