होमपेज › Kolhapur › मुरुडे गावात हत्ती शिरला; ग्रामस्थांत गोंधळ

मुरुडे गावात हत्ती शिरला; ग्रामस्थांत गोंधळ

Published On: Jan 04 2018 1:20AM | Last Updated: Jan 04 2018 12:14AM

बुकमार्क करा
आजरा : प्रतिनिधी 

मुरुडे (ता. आजरा) येथे बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हत्ती थेट प्राथमिक शाळेच्या दिशेने गावात शिरल्याने गावात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सुमारे अर्ध्या तासाच्या थरार नाट्यानंतर वन खात्याच्या कर्मचार्‍यांनी हत्तीला पारपोली, का. कांडगावच्या दिशेने हुसकावून लावण्यात यश मिळवले. 

आज, अचानक हत्ती गावाच्या दिशेने आल्याने गावकर्‍यांची पळताभुई थोडी झाली. सुनील गोरे यांच्या शेतातून सत्ती थेट प्राथमिक शाळेच्या दिशेने आला. रात्रीपासून तो गावालगतच्या शेतातच होता, असे स्थानिक शेतकर्‍यांनी सांगितले. अचानक आलेल्या हत्तीला हुसकावून लावण्यासाठी ग्रामस्थांनी तातडीने वनाधिकार्‍यांशी संपर्क साधला. ग्रामस्थ व वनाधिकार्‍यांनी संयुक्त मोहीम राबवून हत्तीला हुसकावून लावले.