Thu, Feb 21, 2019 21:45होमपेज › Kolhapur › कोल्हापूर विभागात अठरा हजार कृषिपंपाना कनेक्शन

कोल्हापूर विभागात अठरा हजार कृषिपंपाना कनेक्शन

Published On: Jul 05 2018 1:38AM | Last Updated: Jul 05 2018 1:09AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर परिमंडळात 18 हजार 978 कृषिपंपांचे कनेक्शन दिले जाणार आहे. याकरिता 263 कोटींच्या निविदेची प्रक्रिया महावितरणने सुरू केली आहे. यापुढे कृषिपंपाचे कनेक्शन आता  उच्चदाब वीज वितरण प्रमाणीद्वारेच होणार असल्याचे महावितरणच्या वतीने सांगण्यात आले.

कोल्हापूर जिल्ह्यात 5491 शेतकरी कृषिपंपाच्या जोडणीसाठी प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यासाठी 75 कोटी 21 लाखांच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत. तर सांगली जिल्ह्यातील 13487 प्रलंबित कृषिपंप जोडणीसाठी 187.95 कोटींच्या निविदा मागविल्या आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच संपूर्ण जोडण्या उच्चदाब वितरण प्रणालीतूनच मिळणार आहेत. शेतकर्‍यांना त्यांच्या गरजेनुसार 10, 16 व 25 केव्हीए क्षमतेच्या छोट्या थ्री फेज वितरण रोहित्राद्वारे वीज जोडणी मिळणार असून, एका रोहित्रावर फक्‍त एक किंवा दोन कृषिपंप असणार आहेत.