Mon, May 20, 2019 10:09होमपेज › Kolhapur › चंद्रदर्शन झाल्यास उद्या ईद

चंद्रदर्शन झाल्यास उद्या ईद

Published On: Jun 15 2018 1:05AM | Last Updated: Jun 15 2018 12:44AMकोल्हापूर : प्रतिनिधी

चंद्रदर्शनाची साक्ष मिळाली तर, शनिवारी (दि. 16) कोल्हापुरात ईद साजरी होणार अथवा ईद एक दिवस पुढे म्हणजेच रविवारी साजरी केली जाणार आहे, असा निर्णय गुरुवारी झालेल्या हिलाल कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. बाजारपेठांतून मात्र ईदचा अमाप उत्साह दिसून आला. खरेदीसाठी मुस्लिम बांधवांनी आज महाद्वार, ईद फेस्टिवल, राजारामपुरी आदी ठिकाणी गर्दी केली होती.

रमजान ईदची शहरात जोरदार तयारी सुरू आहे. बाजारपेठांत सर्व वस्तूंनी गर्दी केली आहे. ईद शनिवारी असो वा रविवारी या निर्णयावर अवलंबून न राहता, येथील मुस्लिम बांधवांकडून ईदची तयारी सरू आहे. गुरुवारी सायंकाळी ईदच्या खरेदीसाठी महाद्वार रोडला नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. या ठिकाणी कपडे, साजश्रुंगाराच्या वस्तू, चप्पल, पर्स आदी अनेक वस्तूंनी गर्दी केली होती. ईद फेस्टिव्हलमध्येही खरेदीसाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली होती. 

कपडे, साजश्रुंगारासोबतच या ठिकाणी शिरखुर्मा करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध असल्याने महिलांची या ठिकाणी मोठी गर्दी दिसून आली. बिर्याणीसाठी लागणारे मसाले, तांदूळही इथे उपलब्ध असल्याने ईद फेस्टिव्हलला पहिली पसंती लाभली आहे.