Tue, Nov 13, 2018 10:58होमपेज › Kolhapur › फुटबॉल महासंग्राम तर्फे खेळाडूंच्या ‘करिअर’ साठी प्रयत्न

फुटबॉल महासंग्राम तर्फे खेळाडूंच्या ‘करिअर’ साठी प्रयत्न

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

शतकी परंपरा लाभलेल्या कोल्हापूरच्या फुटबॉलला ग्लॅमर प्राप्त करून देणार्‍या ‘फुटबॉल महासंग्राम’ तर्फे आता खेळाडूंच्या करिअरसाठी (भवितव्य) पाऊले उचलली जाणार आहेत. यापूर्वी  सर्वाधिक बक्षीसांचे भक्कम आर्थिक पाठबळ देणारी स्पर्धा असा नावलौकीक मिळविला आहे. 

सॉकर अ‍ॅमॅच्युअर इन्स्टिट्यूट (साई) तसेच ‘फुटबॉल महासंग्राम’ तर्फे सन 2005 पासून स्पर्धेचे दिमाखदार आयोजन छत्रपती शाहू स्टेडियमवर केले जाते. असंख्य फुटबॉलप्रेमींच्या पाठबळामुळेच आजपर्यंत ही स्पर्धा यशस्वी ठरली आहे. याचा पुढचा भाग म्हणून फुटबॉलपटूंच्या करिअरच्या उद्देशाने प्रयत्न करण्यात येणार आहेत. जाधव ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या संयुक्त विद्यमाने ‘केएसए’ ए डिव्हीजन सीनियर संघांचे 17 वर्षांखालील संघ तयार करण्यात येणार असून त्यांच्यात ‘अंडर सेव्हन्टी चॅम्पियन ट्रॉफी’ स्पर्धा घेण्यात येणार आहे. 1 जानेवारी 2001 किंवा त्यानंतर जन्मलेल्या खेळाडूंना या संघात सहभागी होऊन आपला खेळ दाखवत फुटबॉल खेळातील करिअरसाठी सज्ज होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणार्‍या खेळाडूंनी संपर्क साधावयाचे संघ व समन्वयक-प्रशिक्षक असे : पाटाकडील तालीम ‘अ’-‘ब’ (संजय चिले), प्रॅक्टिस क्लब ‘अ’-‘ब’ (राजेंद्र वायचळ), दिलबहार तालीम ‘अ’-‘ब’ (प्रमोद भोसले), खंडोबा तालीम मंडळ (योगेश चौगुले), बालगोपाल तालीम (सुशांत चव्हाण), शिवाजी तरुण मंडळ (अमित इंगळे), फुलेवाडी क्रीडा मंडळ (युवराज पाटील), संध्यामठ तरुण मंडळ (सिद्धार्थ कुराडे), संयुक्त जुना बुधवार पेठ (महावीर पोवार), उत्तरेश्‍वर तालीम (सचिन आयरेकर), साईनाथ स्पोर्टस् (गौरव माने), कोल्हापूर पोलिस (राजेंद्र घारगे), मंगळवार पेठ फुटबॉल संघ (उमेश पाडळकर), ऋणमुक्तेश्‍वर फुटबॉल संघ (ऋषीकेश पाडळकर).
 

Tags : atalfootball2018, Football Mahasangram kolhapur 


  •