Sun, Jul 21, 2019 15:12
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › शेतकर्‍यांना गरीब ठेवण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीकडून प्रयत्न

शेतकर्‍यांना गरीब ठेवण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीकडून प्रयत्न

Published On: May 07 2018 2:02AM | Last Updated: May 07 2018 1:42AMगडहिंग्लज : प्रतिनिधी

काँग्रेस, राष्ट्रवादी हे दोघेही शेतकरीविरोधी  असून, शेतकर्‍यांना गरीबच ठेवण्याचा प्रयत्न आजवर त्यांनी केला आहे. यामुळेच देशातील गरीब शेतकरी आजही गरीबच राहिला आहे, असा आरोप कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष आमदार पाशा पटेल यांनी केला. नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे ई-मोबाईल पशुचिकित्सालयाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

आ. पटेल म्हणाले, इथेनॉलचा शोध 1931 साली लागला होता. त्यानंतर देशात काँगे्रसची राजवट असतानाही उसापासून तयार होणारे इथेनॉल वापरात आणावे, असे त्यांना कधी वाटले नाही. भाजपच्या अटलबिहारी वाजपेयी यांनी 2002 साली यासाठी पुढाकार घेतला. आता मोदींच्या काळात याचा वापरही सुरू झाला आहे. त्यावेळेपासून इथेनॉल वापरात आणले असते, तर शेतकरी गरीब न राहता नक्‍कीच श्रीमंत झाला असता. मात्र, काँग्रेसला देशातील शेतकरी गरीबच ठेवायचा होता, जो त्यांच्या ताटाखालचा मांजर बनेल व वर्षानुवर्षे त्यांनाच मतदान करेल.

शेतकर्‍यांना 100 टक्के उत्पादन खर्च व भाव देण्यासाठी कृषिमूल्य आयोगामार्फत पंतप्रधान मोदी यांनी विशेष प्रयत्न सुरू केले असून, याचे परिणाम लवकरच दिसून येतील.देशातील शेतकर्‍यांना चांगले दिवस नक्‍की येतील, असेही ते म्हणाले.

जनावरेही काँगे्रस खात नाहीत...

भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी, आपण जनावरांसमोर काँग्रेस गवत टाकले, तर जनावरे त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. जनावरांनीही काँग्रेसला टाळले आहे, मग तुम्ही कशाला स्वीकारता? असा सवाल केला. याचवेळी त्यांनी डॉ. नंदा बाभुळकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना, डिजिटल फलक चंदगड मतदारसंघात अन् नेत्या नागपुरात, अशा स्थितीतील नेता नको. तुमच्या शेजारी राहणारा, समस्या सोडविणारा नेता निवडा, असेही ते म्हणाले.