Mon, Jun 17, 2019 02:16होमपेज › Kolhapur › दौलतनगरात धुमश्‍चक्री; 13 जणांना अटक

दौलतनगरात धुमश्‍चक्री; 13 जणांना अटक

Published On: Jul 28 2018 1:33AM | Last Updated: Jul 28 2018 12:40AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

दौलतनगरातील तीन बत्ती चौकात गुरुवारी रात्री झालेल्या धुमश्‍चक्रीप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी दोन्ही गटांच्या 30 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून, 13 जणांना अटक केली. अन्य संशयित पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. 
दौलतनगरात लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून गुरुवारी दोन गटांत हाणामारी झाली. यावेळी झालेल्या दगडफेकीत जयश्री पाटील, सुरेखा पाटील, धनाजी पाटील जखमी झाले होते. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. तीन जणांविरोधात गुन्हा दाखल असून, संशयितांची धरपकड सुरू आहे. 

जखमी जयश्री संजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिल ज्ञानू पोवार (वय 35), दिनेश अरविंद कलकुटगी (24), भीमराव लक्ष्मण अलकुटे (46), ओंकार श्रीकांत वाघमारे (19, सर्व रा. तीन बत्ती चौक), आनंद बबन येडगे (19, माऊलीच्या पुतळ्यानजीक), विशाल  वसंत गायतडक (नवश्या मारुतीनजीक), शिवराम शंकर मातीवड्डर (36), यल्लाप्पा पुंडलिक पाटील (20, रा. नवश्या मारुतीनजीक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. धनाजी पाटील, विनायक अलकुटे, विशाल अलकुटे पसार आहेत. 

दुसर्‍या गटातील अजिंक्य संजय पाटील (वय 23), रामचंद्र हणमंत माडीमगीरी (22), उमेश संजय मळगेकर (26), दीपक आनंदा मळगेकर (19), अर्जून हळप्पा माडीमगिरी (51, सर्व रा. दौलतनगर) या पाच जणांना अटक करण्यात आली. तसेच अर्जून ठाकूर, आकाश ठाकूर, राहुल अलकुटकी, अजय पाटील, विशाल गाडीवडर, अजित चव्हाण, अजित पाटील, चंद्रकांत गाडीवडर, अनिल दिंडलकुपे, प्रशांत शिंगाडे, अमोल पाथरवट, रोहीत कुराडे, सुरेश पाथरवट, किरण पाथरवट (सर्व रा. तीन बत्ती चौक) या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार, मीनाक्षी माळी तपास करीत आहेत.