Wed, Mar 20, 2019 23:11होमपेज › Kolhapur › तणनाशक फवारणीमुळे मोरेवाडीच्या युवकाचा मृत्यू

तणनाशक फवारणीमुळे मोरेवाडीच्या युवकाचा मृत्यू

Published On: Mar 03 2018 1:49AM | Last Updated: Mar 03 2018 1:14AMसुळे : वार्ताहर

मोरेवाडी (ता.पन्हाळा) येथील युवकाचा तणनाशक औषध फवारणी करताना अत्यवस्थ झालेने  शुक्रवारी पहाटे खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. सतीश कृष्णात मोरे (वय 25) असे त्या युवकाचे नाव आहे.

सतीश शनिवार (ता. 17) आपल्या शेतामध्ये तणनाशक औषध फवारणीसाठी गेला होता. फवारणी दरम्यान औषधाचा अंश नाका-तोंडाद्वारे शरीरात गेल्यामुळे सतीशला अत्यवस्थ झाल्यासारखे जाणवू लागले. त्याने सदरची बाब फोनवरून घरी कळवली.त्यानंतर नातेवाईकांनी शेतातूनच सतीशला खासगी रुग्णालयात दाखल केले. 

उपचाराच्या सुरुवातीस सतीशने चांगला प्रतिसाद दिला. पण 12 दिवसांच्या दीर्घकालीन उपचारानंतर त्याची प्रकृती खालावत गेली. औषधाचा अंश संपूर्ण शरीरात भिनल्यामुळे अखेर त्याचा मृत्यू झाला. सतीशच्या घरची परिस्थिती हलाखीची असतानासुद्धा हतबल झालेल्या वडिलांनी त्याच्या उपचारासाठी मोठा खर्च केला. त्याच्या मागे आई,वडील, बहिण असा परिवार आहे. सदर घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.